Posts

मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व

Image
                 मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि                    व्यायामाचे महत्त्व  डायबेटिस ज्याला मराठीत 'मधुमेह' म्हणतात, ही एक चयापचय matabolic स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची ग्लुकोज  पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नसल्यास, मधुमेह होतो.  मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत   मधुमेह पहिला प्रकार  या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार करणारे पेशी नष्ट होतात, त्यामुळे शरीराला इन्सुलिन मिळत नाही. मधुमेह दुसरा प्रकार  या प्रकारात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. गर्भधारणा-कालीन मधुमेह: हा मधुमेह काही स्त्रियांच्या गरोदरपणात होतो आणि बाळंतपणानंतर सामान्यतः निघून जातो.  मधुमेहाची लक्षणे: वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री. हाता पायाला मुंग्या ...

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी

Image
      प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी  ( सर्व चित्र संग्रहित )       आई झाल्यानंतर अनेकदा महिलांना स्तनातून दूध येत नसल्याने त्रास होतो. मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.       बाळाला जन्म दिल्यानंतर, स्त्रीचे शरीर स्तनपानासाठी तयार होते. अशा परिस्थितीत, स्तनातून पुरेसे दूध मिळणे खूप महत्वाचे आहे. कारण बाळाला केवळ आईच्या दुधातूनच पोषण मिळते. मात्र, प्रसूतीनंतर काही महिलांना स्तनामध्ये दूध कमी येत असल्याची तक्रार असते.       अनेकदा महिलांना ऐक समस्या भेडसावत असते स्तनातून दूध येत नसल्याने बऱ्याच महिलांना मानसिक त्रास होतो.  बाळाला दूध कसे मिळेल त्याचे पोट भरेल का? मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकता.      खारीक बदाम खिर  प्रसूती नंतर दूध वाढवण्यासाठी खारीक बदामची खिर करुन खावी यात खसखस पण टाकू शकता खसखस टाकून खिर केल्यास जास्त फायदा होतो. अळीव / आहाळू  अळीव ...

बहु्गुणी आले अद्रक

Image
          बहुगणी अद्रक / आले   भारतामध्ये सर्वत्र आल्याची लागवड केली जाते             आले हृदयरोग, तसेच हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आल्याला व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत म्हटले जाते. दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो. कोलेस्ट्राॅल असणाऱ्यांनी आले खाणे फायदेशीर ठरते.             जेवण करण्याआधी ऐक आल्याचा तुकडा मिठ आणि मिरे पूड लावून खाल्यास भूक चांगली लागते. तसेच अन्नाचे पचन होते          आल्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कफ व वायूचे रोग होत नाही.         आलेपाक करून रोज पाण्यात घालून सेवन केल्यास अपचन, उदररोग, पोटफुगने, पोटदुखी, मळमळ, वांती,पोटात गुरगुरणे या विकरावर उपयोग होतो         खोकला किंवा स्वास रोग असल्यास आल्याचा रस एक चमचा, लिबू रस ऐक चमचा आणि मिठ एकत्र करून घेतल्यास फायदा होतो.       अजीर्ण झाल्यास...

ऑक्टोबर हिट (October heat ) घ्या त्वचेची काळजी

Image
      ऑक्टोबर हिट (October heat )               घ्या त्वचेची काळजी  उन्हाळा नसला तरी उन्हळ्याची जाणीव करुन देणारा महिना म्हणजे ऑक्टोबर.  या दिवसात त्वचेचा ओलावा टिकून ठेवणे फार महत्वाचे आहे.दिवसा गरमी आणि रात्री थंडी,  या बदला मुळे  त्वचेवर पण विपरीत परिणाम होऊन त्वचा कोरडी पडायला सुरवात होते प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असल्यामुळे काहींची त्वचा कोरडी पडून त्वचेला खाज येऊन  त्यातून रक्त येण्यास सुरवात होते, काहींचे  डोक्याचे केस रुक्ष होऊन त्यात कोंडा (डँड्रफ )होतो आणि डोक्याला खाज सुटते. आणि डँड्रफ मुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या यायला सुरुवात होते. त्यासाठी या दिवसात त्वचेची योग्य ती काळजी घायला पाहिजे.  त्वचेची आद्रता टिकून ठेवण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थंड किंवा कोमट पाण्याचे चार पाच भपके मारावे.  या दिवसात रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर शक्यतो कमी करावा.घरच्या घरी नैसर्गिक उपाय करावेत आणि जास्तीत जास्त मोसमी फळ भाज्यांचा, पालेभाज्यांचा  उपयोग करावा, जसे की टोमॅटो चा...

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

Image
                      ज्ञानमुद्रा          ज्ञानमुद्रा करताना अंगठ्याची टोक आणि तर्जनीचे टोक यांनी परस्परांना स्पर्श करावा  . ज्ञानमुद्रा करताना शक्यतो पद्मासन स्थितीमध्ये बसूनच ज्ञानमुद्रा करावी कुठलीही मुद्रा तुम्ही केव्हाही करू शकता.         आज ज्ञानमुद्रा याबद्दल माहिती घेऊया            ज्ञानमुद्राच्या सरावाने स्नायू आणि मस्तीष्कला पुष्कळ फायदा होतो.          अंगठा हे बुद्धीचे केंद्र आहे तर्जनीने जर तिच्यावर दाब दिला गेला तर मस्तकामध्ये असणारे पिच्युटरी आणि पीनियल एंड्राइड नावाच्या दोन ग्रंथी असतात त्या दोन ग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे शांत निद्रा येते तसेच मादक द्रव्याच्या व्यसनातून मुक्त होण्यास मदत मिळते.       ज्ञान मुद्रा मस्तकाच्या ज्ञानतंतूंना सक्रिय बनवते, व मन शान्त राहण्यास मदत होते आणि ज्ञानाचा विकास होतो        ज्ञानमुद्रा केल्याने मानसिक एकाग्रता स्मरणशक्ती...

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन

Image
            Yoga For Women         महिलांसाठी योगासने भाग 1                    पद्मासन                 (Lotus pose)  (संग्रहित चित्र )       योगाचा अभ्यास करताना मन स्थिर व चेहऱ्यावर हलकी स्माईल असेल तर दिवस काय संपूर्ण आयुष्य आनंदित घालवू शकतो. तर योगा करताना चेहऱ्यावर नक्कीच हसू ठेवा आणि आसनाला सुरवात करा           योगासन करताना सर्वात आधी शरीर व मन आसन करायला पूरक असले पाहिजे बऱ्याच वेळी मुली महिला योगा करायचा म्हणून जबरदस्ती योगा करायला जातात. जर तुमचं मन खरोखरच तयार असेल तरच करा.         सर्व प्रथम आज आपण पद्मासन कसे करतात व त्याचे फायदे याबद्दल जाणून घेऊ..                     पद्मासन   (संग्रहित चित्र )         पद्मासन हे बैठकीचे आसन आहे यात दोन्ही पायांचे तळवे कमळाच्या पाकळ्या...

जागतिक योग दिवस

Image
           जागतिक योग दिवस          आज जागतिक योग दिवस योग ही भारतीयांना ऋषीमुनींनी दिलेली देणगी आहे. निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा वेळ आपण आपल्या शरीरासाठी देणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम व योगासने,प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. करिता प्रत्येकाने योगासने करणे गरजेचे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमधील “योग” संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग...