गोमुखासन
गोमुखासन गोमुख म्हणजे गाईचे तोंड या आसनात पायांची रचना गोमुखासारखी भासते व पावले तिच्या कानांप्रमाणे वाटतात म्हणून या आसनास गोमुखासन म्हणतात. दोन्ही पाय जमिनीवर नितंबाच्या बाजूस ठेवून शरीर स्थिर ठेवल्यास ते गोमुखाकृती भासते म्हणून त्याला गोमुखासन असे म्हणतात. कृती पाय लांब करून दंडासणात बसावे उजवा पाय डाव्या पायाखालून डावीकडे दुमडून त्याची टाच डाव्या नितंबा चिटकवून ठेवा आता डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पाया वरून उजवीकडे नेऊन त्याची टाच उजव्या नितंबाला चिटकवून ठेवा दोन्ही गुडघे एकमेकांवर येतील अशी पायांची रचना करा डावा हात वर करा व कोपऱ्यात वाकवून डोक्याच्या मागे पाठी कडे न्या डावे कोपर डोक्याच्या मागे वरच्या दिशेने राहील उजवा हात उजवीकडून पाठीकडे न्या व तळहात वर सरकवून शेवटी दोन्ही हातांची बोटे एकमेकांना पकडा. पाठीचा कणा ताठ ठेवा शरीर स्थिर ठेवा मन शांत ठेवा आणि समोर बघा व सावकाश डोळे मिटा श्वसन स्वाभाविक व शांतपणे चालू असू द्या. गोमुखासन अर्धा ते एक मिनिटापर्यंत करावे अधिक वेळही करता येते परंतु ...