Posts

Showing posts with the label भुजंगासन

पाठदुखीसाठी योगासन | Back Pain Relief Yoga in Marathi

Image
    पाठदुखीसाठी योगासन | Back     Pain Relief Yoga in Marathi आजच्या धावपळीच्या जीवनात पाठदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे.   जास्त वेळ बसून काम करणे, चुकीची बैठक, शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताणतणाव यामुळे अनेकांना पाठदुखीचा त्रास जाणवतो. योगासनांचा नियमित सराव केल्यास पाठदुखी कमी होण्यास मदत होते आणि शरीर लवचिक राहते. सूचना: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. तीव्र वेदना, दुखापत किंवा वैद्यकीय समस्या असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाठदुखी होण्याची सामान्य कारणे जास्त वेळ एकाच जागी बसणे चुकीची झोपण्याची किंवा बसण्याची पद्धत व्यायामाचा अभाव वजन वाढणे मानसिक ताणतणाव पाठदुखीसाठी उपयुक्त योगासन भुजंगासन (Cobra Pose)  भुजंग म्हणजे नाग या आसनाचे अंतिम स्थितीत शरीराचा आकार फणा काढलेल्या नागाप्रमाणे भासतो म्हणून या आसनास भुजंगासन असे म्हणतात. भुजंगासन मणक्याची लवचिकता वाढवण्यास मदत करते. यामुळे कंबरेवरील ताण कमी होतो आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. भुजंगासन कसे करावे: पोटावर झोपून, हातांच्या साहाय्याने छाती हळूहळू वर उचला. श्वास सामान्य...

पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन

Image
                   भुजंगासन पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन भुजंग म्हणजे सर्प. किंवा साप हे आसन  पोटावर झोपून करावयाचे आहे या  आसनामध्ये दोन्ही पाय एकमेकास जोडून  असतात व   दोन्ही पाय आणि  नाभीपर्यंतचा भाग जमिनीस टेकलेला  असतो , तर कमरेपासून मस्तकापर्यंतचा  भाग वर उचललेला असतो. त्यामुळे ही  आकृति नाग जसा त्याचा  फणा काढुन  असतो.  तशी आकृती या आसनाच्या  अंतिम स्थितीत दिसते म्हणून यास  भुजंगासन किंवा सर्पासन असे नाव पडले   या आसन  स्थितीत आपण आपल्या  पाठीच्या कण्याला  मागच्या  दिशेस वाकवतो. त्यामुळे पाठीचा  कणा लवचिक बनतो, आसनांमध्ये बरीचशी  अशी आसने आहेत जी पाठीचा कणा  लवचिक ठेवायला मदत करतात त्यातीलच  हे एक आसन आहे.  आसन कसे करायचे ( कृती ) 1)सर्व प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हात  शरीराच्या बाजूस ठेवुन  व पंजे  आकाशाकडे करावेत. चेह...