तृषा शमन करणारे गुणी कलिंगड

तृषा शमन करणारे गुणी कलिंगड ग्रीष्म राजा च आगमन झालं की कडक उन्हाळा सुरु झाला समजायचं साधारण पणे 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत हा ग्रीष्म राजा आपल्याकडे ठाण मांडून बसतो. आणि सुरु होते रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही, आणि घामाच्या धारा आणि मग तहानेने घसा कोरडा पडतो रख राखीत उन्हात अंग भाजून निघते आणि घामाच्या धारा सुरु झाल्या की घसा कोरडा पडतो अश्यातच वाटते की घश्याची कोरड कमी करावी आणि मग आठवते ऊस, कलिंगड, टरबूज खरबूज संत्री,ही सगळी फळ आपली तहान भागवते, त्यातीलच एक फळ म्हणजे टरबूज किंवा कलिंगड ज्याला इंग्लिश मधे watermelon म्हणतात, कलिंगडाचे मूळ स्थान हे आफ्रिका आहे आणि जगातील सर्वात उष्ण देश हा आफ्रिका आहे, भारत देशात साधारण नोव्हेंबर महिन्यात कलिंगडाची लागवड केली जाते, गडद हीरव्या रंगाचे, टरबूज आतून लाल भडक आणि त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात असे हे टरबूज उन्हाळ्यात आपली तहान भागवतात. भारतात कलिंगडाची लागवड मारवाड, गुजरात, मथुरा, मधे मोठ्या प्रमाणात होते. टरबूजा मधे प...