नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवेद्य

नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवद्य ||या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता|| नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ भारतात दरवर्षी धूम धडाक्यात साजरी होणारी नवरात्री या वर्षी मात्र कोरोनाच्या सावटा मुळे लोकांचा उत्साह थोडा ओसरलेला दिसत असला तरी पण आपल दुःख विसरून सर्व भाविक मोठ्या भक्ती भावाने देवीच्या आगमनाची तयारी करताहेत. यंदाच्या वर्षी निज अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जात आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजीपासून नवरात्रारंभ होणार आहे. याच दिवशी सकाळी ०६ वाजून २७ मिनिटे ते १० वाजून १३ मिनिटांपर्यंत घटस्थापन करण्याचा मुहूर्त आहे. यानंतर सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल. जाणकारांच्या मते यावर्षी नवरात्रात एक अद्भूत शुभ योग जुळून येत आहे.तो म्हणजे या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी शनी आणि गुरु आप आपले स्वामीत्व असलेल्या मकर आणि धनु राशी मधे विराजमान असतील. हा...