उत्तम आरोग्यासाठी दैनिक आहार भाज्यांचे सूप भाग 1
उत्तम आरोग्यासाठी दैनिक आहार भाज्यांचे सूप भाग 1 निसर्गोपचार शास्त्रामध्ये कच्च्या भाज्या खाण्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व भाज्या उकडून खाण्याचे ही खुप महत्व आहे, पण भाज्या नुसत्या उकडून खाल्ल्या तर चव लागत नाही म्हणून निरनिराळ्या प्रकारची सूप बनवता येते. आज आपण गाजर व बीटाचा सूप कसा करायचा ते बघू या गाजर बिट सुप पिल्याने डोळ्याचे विकार, त्वचेचे विकार दूर होतात, तसेच रक्त शुद्धी होते. साहित्य 4 गाजर 2 बिट 2 चमचे मोड आलेले कोणतेही कड धान्य 1 इंच आल्याचा तुकडा ½ चमचा मिरेपूड चवी पुरते मिठ कृती गाजर व बिट स्वच्छ धुवायची आणि छोटे तुकडे करावे गाजरचा मधला भाग काढून टाकावा तसेच बीटाची साल सुद्धा काढावी प्रेशर कुकर मध्ये गाजर बिटाच्या फोडी टाकून 3ते 4 शिट्या काढून घ्याव्या. त्यानंतर शिजलेले गाजर बिट मिक्सर मधून बारीक करून किंवा चाळणीतून गाळावे व परत गरम करून त्यात मिरे पूड जिरे पूड आणि चवीपुरते मिठ टाकावे आणि आवडत असल्यास टोस्ट चे तुकडे टाका...