Posts

Showing posts with the label पावसाळा

ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? | उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा Skin Care Tips

Image
ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? | उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा Skin Care Tips उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या आजच्या लेखात ऋतूनुसार संपूर्ण स्किन केअर टिप्स आणि घरगुती उपाय.  ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? प्रत्येक ऋतूनुसार हवामान बदलते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि आरोग्यावर होतो. योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहते आरोग्य चांगले राहिले तर त्वचा निरोगी, तजेलदार आणि सुंदर राहू शकते.  १. उन्हाळ्यात त्वचेची काळजी उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे त्वचा टॅन होते, घामोळे येतात आणि पिंपल्स वाढतात.या साठी काय करावे तर दिवसाला 8–10 ग्लास पाणी प्या SPF 30+ सनस्क्रीन वापरा दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ धुवा काकडी, अॅलोवेरा जेल, गुलाबपाणी वापरा टोपी, स्कार्फ वापरून बाहेर पडा  काय करू नये ? जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावे दुपारी 12–4 या वेळेत बाहेर जाऊ नये. 🌧 २. पावसाळ्यात त्वचेची काळजी पावसाळ्यात आर्द्रता वाढते. त्वचा तेलकट होते आणि फंगल इन्फेक्शनची शक्यता वाढते. ...

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...