ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? | उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा Skin Care Tips

ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी? | उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा Skin Care Tips
उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या आजच्या लेखात ऋतूनुसार संपूर्ण स्किन केअर टिप्स आणि घरगुती उपाय.

 ऋतूनुसार त्वचेची काळजी कशी घ्यावी?
प्रत्येक ऋतूनुसार हवामान बदलते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि आरोग्यावर होतो. योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहते आरोग्य चांगले राहिले तर त्वचा निरोगी, तजेलदार आणि सुंदर राहू शकते.

 १. उन्हाळ्यात त्वचेची काळजी

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे त्वचा टॅन होते, घामोळे येतात आणि पिंपल्स वाढतात.या साठी काय करावे तर दिवसाला 8–10 ग्लास पाणी प्या
SPF 30+ सनस्क्रीन वापरा
दिवसातून 2 वेळा चेहरा स्वच्छ धुवा
काकडी, अॅलोवेरा जेल, गुलाबपाणी वापरा
टोपी, स्कार्फ वापरून बाहेर पडा

 काय करू नये ?

जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळावे
दुपारी 12–4 या वेळेत बाहेर जाऊ नये.

🌧 २. पावसाळ्यात त्वचेची काळजी

पावसाळ्यात आर्द्रता वाढते. त्वचा तेलकट होते आणि फंगल इन्फेक्शनची शक्यता वाढते.

 काय करावे?

चेहरा स्वच्छ व कोरडा ठेवा
अँटी-बॅक्टेरियल फेसवॉश वापरा
हलका मॉइश्चरायझर वापरा
ओले कपडे त्वरित बदला

 काय टाळावे?

पावसात भिजल्यानंतर त्वचा न धुता ठेवणे

जास्त मेकअप वापरणे

 ३. हिवाळ्यात त्वचेची काळजी

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, खाज सुटते आणि ओठ फाटतात.

काय करावे?

चांगला मॉइश्चरायझर वापरा
नारळ तेल किंवा बदाम तेल लावा
कोमट पाण्याने आंघोळ करा
लिप बाम वापरा
दुधावरची साय लावा

 काय टाळावे?

खूप गरम पाण्याने आंघोळ
त्वचा कोरडी ठेवणे

निष्कर्ष

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ऋतूनुसार काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य आहार, स्वच्छता आणि साधे घरगुती उपाय केल्यास त्वचा प्रत्येक ऋतूत सुंदर आणि तजेलदार राहते.

प्रश्न 1प्रत्येक ऋतमध्ये सनस्क्रिन लोशन लावणे आवश्यक आहे का?

हो, सूर्यप्रकाश वर्षभर असतो त्यामुळे हलका सनस्क्रीन वापरणे योग्य आहे.

 प्रश्न 2 पावसाळ्यात मुरूम, पिंपल्स का वाढतात?

आर्द्रतेमुळे त्वचेतील तेल वाढते आणि बॅक्टेरिया वाढतात.

प्रश्न 3 हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते?

थंड हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो.त्यामुळे हिवाळ्यात त्वचा खुप कोरडी पडते

 प्रश्न 4 त्वचेसाठी घरगुती उपाय सुरक्षित आहे का?

हो, पण त्वचा संवेदनशील असल्यास आधी patch test करा.जसे की कुणाला जायफळ उगाळून मुरूम, पिंपल्स ला लावल्यास खाज सुटते त्यासाठी test आवश्यक आहे.


धन्यवाद 🙏🏻🌺🙏🏻
Yoga and Naturo Beauty Clinic
9822363909

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी