Posts

Showing posts with the label बरबटी

पौष्टीक चवळीची शेंग

Image
         पौष्टीक चवळीची शेंग  चवळीची शेंग भारतात सर्वत्र मिळते भारतामध्ये चवळीचे उत्पादन जवळजवळ सर्वच ठिकाणी होत असते तसे पहिले तर चवळीचे मूळ स्थान  आफ्रिका हे आहे.  पावसाळ्याच्या सुरुवातीस आणि माग महिन्यात चळवळीची लागवड करतात पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरलेल्या चवळीच्या वेलाला भाद्रपद आणि कार्तिक महिन्यात  शेंगा लागतात,ज्वारी बरोबर मिश्र पीक म्हणून चवळी पेरली  जाते.  चवळीचा रोप उंच वाढून त्यानंतर ते वेली वर्गात वाढते.  चवळी तीन प्रकारे असते पांढरी लाल आणि काळ्या रंगाची अशा तीन प्रकारच्या चवळी असतात.  मोठ्या चवळीच्या शेंगा लहान व पातळ असतात तर दुसऱ्या प्रकारच्या चवळीच्या शेंगा मोठ्या आणि जाड असतात  लहान चवळीच्या शेंगा मधे तीन-चार प्रकार आढळून येतात त्यापैकी काही चवळीच्या शेंगा अडीच ते तीन फूट लांब असतात चवळीपेक्षा चवळीच्या शेंगा चवीला स्वादिष्ट लागतात चवळी व चवळीच्या शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो शेंगांची भाजी चवीला चांगली लागते त्यामध्ये जर शेंगदाणे वगैरे टाकून तिळाचा कूट टाकून भाजी केली तरीही खूप छान ल...