कोकिळा व्रत कथा

कोकिळा गौरीची कहाणी कोकिळा व्रताची कहाणी ही श्री भगवान शंकर आणि त्यांची अर्धांगिनी दाक्षायणी यांच्या विषयी आहे. एक दिवस दक्ष प्रजापती यांनी महायज्ञ करायचे ठरवले होते.त्यासाठी दक्ष प्रजापतीनी सर्व देव-गंधर्वांना आमंत्रण दिले होते, परंतु आपली कन्या दाक्षायणीला व शंकरांना बोलावले नाही. शंकरांनी दक्षयानी जाऊ नको' म्हणत असताही दाक्षायणी तशीच यज्ञ मंडपाच्या दाराशी आली. दक्षानं तिचं स्वागत काही केलं नाही. त्यामुळे तिचा अपमान झाला; म्हणून दक्षायांनी संतापून गेली. व धावत जाऊन तिनं यज्ञकुंडात उडी घेतली आणि दाक्षायणी जळून खाक झाली आणि त्याच वेळी नारदानं शंकराला ती वार्ता कळवली. शंकरानी रागाने त्यांची जटा शिलेवर आपटली. आणि शिळेतून वीरभद्राची भयंकर मूर्ती प्रगटली. शंकरांनी वीरभ्रदाला व आपला पुत्र गणपतीला सुद्धा यज्ञमंडपात आणले व यज्ञाचा विध्वंस केला.तसेच देव गंधर्वांचे हात-पाय तोडले. मंडप फाड...