झणझणीत विदर्भ स्पेशल पातोडी ची भाजी

झणझणीत विदर्भ स्पेशल पातोडी ची भाजी झणझणीत रस्स्या साठी साहित्य 1)4 ते 5 कांदे 2)5 ते 6 हिरव्या मिरच्या 3)1 इंच आल्याचा तुकडा 4)7 ते 8 लसण्याच्या पाकळ्या 5)1 वाटी चिरलेली कोथिंबीर 6)2 मध्यम आकाराचे टोमॅटो 7)1 वाटी बदाम किंवा शेंगदाणे 8)2चमचे लाल मिर्ची पावडर 9)1चमचा हळद पावडर 10)1चमचा मोहरी 11)चवी पुरते मीठ मला शेंगदाणे आवडत नाही त्यामुळे मी बदाम टाकते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणं तीळ शेंगदाणे, घेऊ शकता कृती सर्व प्रथम कांदे बारीक चिरून तळून घ्यावे, आणि त्याची पेस्ट करावी. नंतर आले, लसुण ची पेस्ट करावी आणि मग मस्त टोमॅटो मधे बदाम टाकून मिक्सर मधे बारीक करावे. वरील सर्व साहित्य तयार करू ठेवावे. नंतर एका भांड्यात 2 मोठे चमचे तेल घेऊन जिरे मोहरी आणि हिंग ला तडका देऊन मग त्यात कांद्या ची पेस्ट टाकून कांदा साधारण गुलाबी होईस्तोवर परतावा मग आले लसुण पेस्ट टाकावी आणि मग आपल्या आवडी प्रमाणे ह...