त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत | Triphala Churna Benefits in Marathi
त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत | Triphala Churna Benefits in Marathi आजच्या लेखात त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत जाणून घ्या. पचन सुधारणे, वजन कमी करने , त्वचा व केसांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्रिफळा चूर्ण कसे उपयुक्त आहे ते वाचा. आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण हे एक अत्यंत प्रभावी, सुरक्षित आणि बहुगुणी औषध मानले जाते. शरीराचे शुद्धीकरण, पचनसंस्था सुधारणा, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी त्रिफळा चूर्णाचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो. आता त्रिफळा चूर्ण म्हणजे काय?हा प्रश्न बहुतेक जणांना पडला असेल तर त्रिफळा म्हणजे तीन फळांचे मिश्रण – आवळा हरितकी बिभीतकी या तिन्ही औषधी फळांचे चूर्ण करून तयार केले जाते, त्यालाच त्रिफळा चूर्ण म्हणतात. त्रिफळा चूर्णचे आरोग्यदायी फायदे 1️⃣ पचनसंस्था सुधारते त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठता, गॅस, अपचन व आम्लपित्त कमी करते. पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते. 2️⃣ वजन कमी करण्यास मदत मेटाबॉलिझम वाढवून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास सहाय्यक ठरते. 3️⃣ रोगप्रतिकारशक्ती वाढवते शरीराला आतून बळकट करून वारंवार होणारे आ...