hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

 केसांचे आरोग्य 

केसांची निगा राखण्यासाठी

योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय






      लांब काळेभोर दाट केस  कुणाला नाही आवडत, पण आज काल सर्वच जण केसांची नीगा राखण्यासाठी साठी कुठलाही प्रयोग करतात.केसांना वेगवेगळे कलर किंवा डाय लाऊन केसांचे आरोग्य खराब करताहेत आज काल 10 -12 वय असणारे लहान मुल  मुली केसांना विविध प्रकार चे जेल लाऊन hair स्टाइल करताना दिसतात.   आणि आहार सुद्धा नीट घेत नाहीत . 


        सतत mobile मध्ये राहून राहून पण आरोग्य कडे दुर्लक्ष होत आहे.


     केसांचे आरोग्य नीट राहावे या साठी केसांची तेल मालिश किंवा कोरडी मालिश पण उपयुक्त ठरते, त्यासाठी आठवड्यातून निदान दोन वेळा तरी  केसांना मालीश करावी. मोबाईल बाजूला ठेऊन  स्वतःसाठी तरी 5 - 10 मिनिट काढावीत 


      तेल मालिश  करताना तेल नेहमी कोमट करूनच उपयोगात आणावे 


     लहान मुला - मुलीची डोक्याची मालिश रोज रात्री झोपताना करावी. हळुवार केसातून हात फिरवावा जेणे करुन त्यांना शांत झोप लागेल यामुळे त्यांची चीड चीड कमी होउन अभ्यासात मन लागेल,  बरेच मुल अभ्यासाचं टेन्शन घेतात त्यासाठी हा प्रयोग करावा. 


      केसात कोंडा असेल तर मालिश करताना कापूर टाकलेले तेल वापरावे.


      केस विंचरताना नीट विंचरावे केसांचे दोन भाग करुन मग परत त्या दोन भागांचे 4 भाग करुन  मग केस विंचरावे म्हणजे गुंता होत नाही व केस पण गळत नाही.   


        बऱ्याच स्त्रिया सगळे केस एका बाजूला घेऊन विंचरतात  ह्या  चुकीच्या  पद्धतीने केस विंचरल्यावर केस गळणारच.  


       केस विंचरताना नेहमी मोठ्या दातांचा कंगवा  वापरावा.. 




       हेअर ड्रायरचा वापर शक्यतो करूच नये. 


    केसांची चांगली निगा राखली तर केस नक्कीच चांगले आणि   निरोगी राहतील त्या साठी काही  घरगुती रोजच्या वापरातील जसे तीळ, धणे, कढीलिंब, जवस, लिंबू  यांचा रोजच्या आहारात  नियमित आणि योग्य वापर केला तर केस वाढण्यास  मदत होते. 

      जसे की  केस धुतल्या नंतर गुलाबजल मध्ये 1 किंवा 2 लिंबू चा रस  मिसळून लावल्यास  केस नरम मुलायम  आणि चमकदार होतील केस विंचरताना तूटणार नाही. 


         एक चमचा भाजलेली जवस रोज जेवणानंतर खाल्ल्यास केसांचा  नरमपणा  टिकून राहील व त्वचा  कोरडी पडणार नाही. 

      धणे आणि खडी साखर किंवा मध  आणि धणे  पॉवडर चे चाटण घेतल्यास डोके दुखणार नाही व चीड चीड  कमी होऊन चिंता पण कमी होते, बरेचदा चिंता  असेल तर केस गळतात, 


         भाजलेले तीळ एक चमचा आणि   एक चमचा सौफ  नियमात सेवन केल्यास केस वाढतात. 


         कढीलिंबाची पाने आणि लसुण  तव्यावर तुपात भाजून जेवताना खाल्ल्यास केस वाढीस मदत होते. 


          शक्य असेल तर वज्रासनात बसून रोज केस विंचरावे.


          बरेच  जणांचे केस धुळकट, मटमैले, बेरंग असतात असल्या केसांसाठी बेसन आणि दही आणि 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करुन अर्धा तास केसांना लावावा. याने केस हेल्दी आणि चमकीले होतील. 


          केसांना फाटे फुटले असतील किंवा केस रुक्ष असतील तर मेहंदी मध्ये मूठभर कढीलिंबाची पान वाटून, 1 चमचा दही,  1 चमचा मुलतानी माती, 1 चमचा बेसन, ऑपशनल (1 अंड ) 1 चमचा खोबरेल तेल हे सर्व मिक्स करुन ताकात भिजवून केसांना लावावे व  सुकेपर्यंत  ठेवावे आणि नंतर शाम्पूने केस धुवावे. 

             आठवड्यातून 1 वेळा किंवा 15 दिवसातून एक वेळ तरी दही आणि बेसन याने केस धुवावे 




           साधारण वयाच्या  35 व्या वर्षानंतर





माणसांमध्ये  टक्कल पडायला सुरुवात होते. त्या साठी आधीच योग्य ती काळजी घेतली तर टक्कल पडणार नाही तेव्हा योग्य आहार घेणे जरुरीचे आहे आणि काळजी घेणे महत्वाचे आहे, त्यासाठी उपाय म्हणुन सरसो च्या तेला मध्ये आवळा पॉवडर मिसळून लावावी. किंवा सरसोच्या  तेलात   मेहंदीची पाने टाकून उकळावे व  ते तेल  लाऊन मालिश करावी. 

      पडवळ च्या पानांचा रस लावल्यास मदत होते. 

             केस खूपच  गळत असतील तर आवळ्याचे चूर्ण तिळाच्या तेलात मिसळून लावावे. 






      केस विंचरताना मधेच तुटत असतील तर विंचरताना गुलाबजल व थोडे ग्लिसरीन घेऊन केसांना लावावे केस तुटत नाही. 


      केस वाढीसाठी मूठ भर तिळाची पाने, मूठभर कढीलिंबाची पाने, पाण्यात उकळावे व पाणी अर्ध झाल्यानंतर थंड करुन एका काचेच्या बरणीत भरून ठेवावे व तेला सारखे ते पाणी लावावे किंवा कापसाच्या बोळ्याने भांगात थोडे थोडे लावावे. 

            


केसांसाठी निसर्गोपचार व योगा 


काळी माती कोमट पाण्यात भिजवून तो लेप केसांना लावावा व  मालिश करावी त्यानंतर एक कापड गरम पाण्यात भिजून तो कपडा डोक्यावर गुंडाळावा व 20- 25 मिनिट ठेऊन नंतर डोक धूवून घ्यावे. त्या नंतर आवळा किंवा त्रिफळा चूर्ण ताकात भिजवून डोक्याला लाऊन 5 मिनिट ठेऊन डोक कोमट पाण्याने धुवून घ्यावे व केस कोरडे झाल्यानंतर तिळाचे किंवा आवळ्याचे तेल डोक्याला लावावे. 

हा प्रयोग महिन्यातून 2 वेळा करावा केस वाढण्यास मदत होते.

             



योगासन 


1)वज्रासन 





2)शशांकासन 





3)पश्चिमोत्तानासन 






4)शिर्षासन 

   




5) सर्वांगासन 




6) सूर्यनमस्कार 

संग्रहीत चित्र 

प्राणायाम 


1)अनुलोम विलोम 

संग्रहीत चित्र 


2)कपालभाती 



     वरील आसन आणि प्राणायाम केल्यास शारीरिक, मानसिक  आरोग्य सुधारते, तन आणि मन निरोगी असेल तर आरोग्याच्या कुठल्याही समस्या होनार नाही. तसेच ज्ञान मुद्रा केल्यास डोक शांत राहते एकाग्रता वाढते चीड चीड कमी होते तणाव कमी होतो त्यामुळे केस वाढीस पण मदत होते.

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon