Posts

Showing posts with the label आल

आल्याचे फायदे | Ginger Benefits in Marathi

Image
 आल्याचे फायदे | Ginger Benefits in Marathi आलं हे आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्त्वाचे आणि औषधी गुणधर्म असलेले घटक आहे. प्राचीन आयुर्वेदात आल्याला “महाऔषध” मानले जाते. सर्दी–खोकल्यापासून ते पचन, वजन कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी आलं अत्यंत उपयोगी आहे. आजच्या लेखात आपण आल्याचे फायदे, उपयोग, तोटे आणि सेवन पद्धत सविस्तर पाहणार आहोत.  आल्याचे प्रमुख फायदे 1. पचनशक्ती सुधारते आलं पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. अपचन, गॅस, पोट फुगणे आणि आम्लपित्त यावर आलं गुणकारी ठरते. उपाय: जेवणानंतर थोडेसे आलं आणि चिमूटभर मीठ खावे 2. सर्दी, खोकला आणि घसा दुखणे कमी करते आल्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे सर्दी, खोकला आणि घशाच्या त्रासावर उपयोग होतो. उपाय: आलं + मध + काळी मिरी पावडर एकत्र करून चटण घेणे 3. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दररोज मर्यादित प्रमाणात आलं घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून संरक्षण मिळते. 4. सांधेदुखी आणि सूज कमी करते आल्यामधील Anti-inflammatory घटक सांधेदुखी, गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. 5. हृदय ...

सांधेदुखी आणि स्नायूदुखी साठी घरगुती उपचार

Image
सांधे दुखी आणि स्नायू दुखी साठी       घरगुती उपचार   पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखी आणि स्नायूदुखीचा त्रास सुरु होतो. वेदना आणि दुखणे खूप प्रमाणात वाढतात,गुडघे दुखी डोके वर काढते.  सांधेदुखी आणि वेदना दुखी किंवा कोणतीही दुखणे असो त्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे.  लवंगाच्या तेलाने दररोज मालिश केल्यास वेदना कमी होऊ शकतात.  मीर पावडर   मिरे बारीक करून त्यात थोडेसे तेल टाकून त्वचेला मालिश करावी त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.  एक चमचा मिरपूड जवसाच्या तेलामध्ये लाल होईपर्यंत परतवावी व बारीक करून त्यामध्ये जवसाचे तेल टाकून ठेवावे आणि त्या तेलाने दररोज मालिश करावी.  हळद  हळदीमध्ये  कर्क्युमिन नावाच तत्व असल्याने वेदना आणि सूज कमी करण्यात मदत करते म्हणून गरम पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये रोज हळद टाकून प्यावी.  वेदना असलेल्या  भागांवर सरसोच्या तेलाने मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.  तसेच गरम पाण्याचा शेक सुद्धा तुम्ही देऊ शकता.  सुंठी पावडर रोज एक  कप दुधामध्ये घेत...