भुलाबाईची गाणी कृष्णा घालितो लोळणं

भुलाबाईची गाणी कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ || काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||धृ|| आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून....||२|| आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||३|| गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी Click करा 👇 भुलाबाईची गाणी