रुचकर वऱ्हाडी ठेचा
रुचकर वऱ्हाडी ठेचा
साहित्य 1
1)10 ते 12 हिरव्या मिर्च्या
2) 5 ते 6 लसुण पाकळया
3) कोथिंबीर
3) 1 चमचा जिरे
4) 1 चमचा मिठ
5) चिमूट भर हळद
6) एक मोठा चमचा तेल
कृती
सर्व प्रथम मिर्च्या धुवून सुकू द्याव्या, नंतर त्यात वरील सर्व जिन्नस एकत्र करुन खलबत्त्यात कुटून द्यावे, (खलबत्त्यात या साठी की त्याने चव मस्त्त लागते, मिक्सर मधे केलेली चव मला आवडत नाही म्हणुन), तुम्ही मिक्सर मधे करू शकता. नंतर एका भांड्यात तेल गरम करुन त्यात मोहरीचा तडका देऊन हिंग टाकावे, आणि मग ठेचलेल्या पेस्ट मधे गरम गरम तेल टाकावे एकदम सुप्पर ठेचा होतो.
आपण नेहमी मिर्च्या तळून मग त्याचा ठेचा करतो.
पण हा ठेचा आधी मिर्च्या ठेचून मग त्यात कडकडीत मोहरी हिंगाचे तेल टाकावे. फारच रुचकर लागतो.
👇
छान
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏🙏
Delete