दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

        दालचिनीचे औषधी गुण 


Medicinal properties of cinnamon



    प्राचीन काळापासून रोजच्या वापरातील मसाल्या मध्ये दालचिनीचा वापर केला जातो.  मसाला  सुगंधी आणि स्वादिष्ट होण्यासाठी तसेच मुखशुद्धी साठी दालचिनीचा  वापर सर्रास होतो. 



इंग्लिश मधे -cinnamon

मराठी -दालचिनी 

गुजराती  -दालचिनी 

संस्कृती -त्वचं



दालचिनी उत्पादन आणि लागवड 




     दालचिनीची झाड सिलोन मध्ये मोठ्या प्रमाणात होतात, या ठिकाणी आपल्याला दालचिनीचे मोठ-मोठे मळे पाहायला मिळतात.  तसेच चीन, जपान या देशात सुद्धा दालचिनीचे उत्पादन भरपूर प्रमाणात होते, 


झाड (tree) 







            दालचिनीचे झाड  साधारण 7 ते  8 फूट उंचीचे असते.काही ठिकाणी 30 ते 35 फूट पाहायला मिळते.


 पाने, फुल,  फळ 



 




     या झाडाची पाने सुगंधी, गुळगुळीत आणि चमकदार असतात. थोडे जाड पान असतात आणि त्यावर 3 रेषा असतात. 

  

                या झाडाची फळे जांभळ्या काळ्या रंगाची असतात 


        आणि फुल पिवळसर असतात 


साल 





       दालचिनीच्या झाडाची जी साल असते तिलाच दालचिनी म्हणतात. 


दालचिनीचे प्रकार 


      दालचिनीचे अनेक प्रकार आहेत. परंतु कॅसिया आणि सिलोन तसेच भारतात होणारी आणि चीनमध्ये होणारी दालचिनी हे प्रमुख प्रकार आहेत.

        

          वैद्यच्या मते भारतात होणाऱ्या दालचिनीची साल खुप जाडी आणि पोकळ असते. त्यामुळे ती जास्त औषधी युक्त असल्या  मुळे ती सुजेवर व विविध विकारात तिचा औषध म्हणुन वापर केला जातो. औषध म्हणुन फार उपयोगी आहे. परंतु खाण्यासाठी ही दालचिनी वापरली जात नाही.  

          

          तसेच हिमालयात असलेली दालचिनी पहाडी दालचिनी म्हणुन ओळखली जाते ती कमी प्रतीची असते. तिचा उपयोग फारसा केल्या जात नाही. 



         आपल्याकडे मसाल्यात वापरली जाणारी दालचिनी ही चीन मधुन आणि कॅशिया,  सिलोन मधुन आपल्याकडे आयात केली जाते. 


       सिलोनी दालचिनी गुणांमध्ये आणि स्वादामध्ये श्रेष्ठ समजली जाते. 

           

          दालचिनीमध्ये पातळ सालीची,  सुगंधी आणि चवीला थोडी तिखट असेल तर ती चांगल्या प्रतीची समजल्या जाते. 


         


           

        तज्ञांच्या मते 


        दालचिनी मध्ये अँटीऑक्सिडेंट, एंटी-इंफ्लेमेटरी, अँटीडायबेटिक आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत आणि ते कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगापासून बचाव करू शकतात.  

  

    दालचिनीचे तेल 






       दालचिनीच्या  झाडाच्या सालीतून, पानातुन  आणि मुळातुन तेल काढले जाते.या तेलाला सिनेमम  ऑइल म्हणतात. हे तेल रंगाने पिवळसर असते. व जसजसे तेल जुनाट होते त्याचा रंग बदलून लालसर पिवळे होते. हे तेल वेदना कमी करणारे तसेच त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते. 


दालचिनीच्या तेलाचे फायदे 




 1) दालचिनी चे तेल पोटातून घेतल्यास            मुरडा कमी होतो.


2)मासिक पाळीत पोट दुखत असेल तेल तर फायदा होतो.


3) वात विकार असणाऱ्यानी दालचिनीचे तेल लावावे किंवा काढा प्यावा. 


 4) शरीर थंड पडले असल्यास किंवा कृश असेल तर दालचिनीच्या तेलाने मालिश करावी. 


5) चेहरा कोमजलेला असेल किंवा चेहऱ्याची त्वचा काळवंडली असल्यास दालचिनीच्या 1-2थेंबाने चेहऱ्यावर मालिश करावी चेहरा सतेज होतो. 


6)मालिश करताना तिळाच्या तेलात दालचिनीचे तेल मिसळून शरीराची मालिश केल्यास रक्तपुरवठा सुरळीत होऊन शरीर धष्ठपुष्ट बनून शरीर सतेज बनते.      



दालचिनीचे फुल  व फळ 





     दालचिनीच्या फुल व फळा पासुन सुगंधित अत्तर काढले जाते. व अर्क काढल्या जातो 


       दालचिनी चे फायदे 




1) दालचिनी, मिरे व अद्रक पाण्यात उकळून ते पाणी पिल्यास सर्दी मध्ये फायदा होतो. 


2) जेवणानंतर पोट फुगत असेल तर आहारात दालचिनीचा वापर करावा 


3) मासिक पळी साफ होण्यासाठी दालचिनीचे चूर्ण घ्यावे.


4) उलटी मळमळ होत असेल तर दालचिनी चे चूर्ण सहदात चाटण घ्यावे 


5) बरेच जणांना नेहमी उलटी चा त्रास होतो अश्या वेळी दालचिनी, आले व मध एकत्र करुन घ्यावे 


6) कान दुखत असल्यास दालचिनी पाण्यात उगाळून त्याचा लेप कानाच्या भोवती लावावा. 


दालचिनीचे फायदे व तोटे 





फायदे 




       तज्ञांनच्या मते दालचिनीत अत्यंत श्रेष्ठ गुण आणि सुगंधित असल्याने तिचा आयुर्वेद, युनानी, मध्ये सर्रास वापर केल्या जातो. दालचिनीचे तेल उत्तेजक असल्याने पोटदुखी, दातदुखी व मुखरोग यावर उपयोगी आहे. 

     तसेच दालचिनी उष्ण, पाचक, वातहारक व रक्तातील स्वेतकणांची वाढ करणारी व शरीराला उत्तेजित करणारी व  जंतुनाशक असल्याने क्षय रोग, वात रोग दूर करते. तसेच उचकी, उलटी मळमळ व अतिसार या विकारात गुणकारी आहे. 


तोटे 




     अतिरिक्त प्रमाणात दालचिनीचे सेवन केल्यास नुकसान होऊ शकते किंवा दीर्घ कालपर्यंत दालचिनीचे सेवन केल्यास शरीरात उष्णता निर्माण होते. उष्ण प्रकृतीच्या लोकांनी दालचिनीचा वापर सांभाळून काळजीपूर्वक करावा. 

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन