टोमॅटोचे औषधीय गुण

टोमॅटोचे औषधीय गुण तुम्ही जर रोजच टोमॅटो सेवन कराल तर तुम्हाला डॉक्टर कडे जावे लागणार नाही "Tomato a day keeps the doctor away " टोमॅटो हे पोषक घटकांनी उपयुक्त अशी एक फळभाजी आहे. टोमॅटोचे मूळ स्थान अमेरिका आहे. परंतु अलीकडच्या काळात जगभरात टोमॅटोची लागवडी भरपूर प्रमाणात होत आहे. सर्वच भाज्यां मधे जगभरात उत्पादनाच्या दृष्टीने टोमॅटोचा क्रमांक पहिला लागतो. टोमॅटोचे उत्पादन भारतात सर्वत्र होते. टोमॅटो लागवडी साठी रेताड जमीनही चालते. वर्षातून दोन वेळा टोमॅटोची लागवड केली जाते. मे - जून आणि ऑक्टोबर - नोव्हेंबर त्यामुळे बाजारात बाराही महिने टोमॅटो मिळतात. पिकलेल्या टोमॅटो मधे शरीराचे पोषण करणारे मौलिक घटक असतात. पिकलेले टोमॅटो चवीला आंबट गोड असतात. या पिकलेल्या टोमॅटो च्या सेवनाने रक्तातील रक्तकण वाढून शरीराचा फिकटपणा दुर होतो. जे...