टोमॅटोचे औषधीय गुण

         टोमॅटोचे औषधीय गुण 


तुम्ही जर रोजच टोमॅटो सेवन कराल तर तुम्हाला डॉक्टर कडे जावे लागणार नाही 

    "Tomato a day keeps the     doctor away "


टोमॅटो  हे पोषक घटकांनी उपयुक्त अशी एक फळभाजी आहे. 


     टोमॅटोचे मूळ स्थान अमेरिका आहे. परंतु अलीकडच्या काळात जगभरात टोमॅटोची लागवडी भरपूर प्रमाणात होत आहे. 

     सर्वच भाज्यां मधे जगभरात उत्पादनाच्या दृष्टीने टोमॅटोचा क्रमांक पहिला लागतो. टोमॅटोचे उत्पादन  भारतात सर्वत्र होते. टोमॅटो लागवडी साठी रेताड जमीनही चालते. 

     वर्षातून दोन  वेळा टोमॅटोची लागवड केली जाते. मे - जून आणि ऑक्टोबर - नोव्हेंबर त्यामुळे बाजारात बाराही  महिने टोमॅटो मिळतात. 

     पिकलेल्या टोमॅटो मधे शरीराचे पोषण करणारे मौलिक घटक असतात.

      पिकलेले टोमॅटो चवीला आंबट गोड असतात. या पिकलेल्या टोमॅटो च्या सेवनाने रक्तातील रक्तकण वाढून शरीराचा फिकटपणा दुर होतो. 

     जेवताना टोमॅटो कच्चे किंवा शिजवून खाल्ले तरी जेवणाची रुची उत्पन्न होऊन जठराग्नी प्रदीप्त होतो, पाचन शक्ती वाढून अनेक प्रकारचे पित्त आणि रक्त विकार दूर होतात. 

     रोज सकाळी टोमॅटोचा रस पिल्यास शरीरात दिवसभर उत्साह राहतो. 

     गर्भवती स्त्री साठी तर टोमॅटो शक्तिवर्धक आहे. गर्भारपनात स्त्री ला शारीरिक आणि मानसिक बळ देते. 

     स्त्रियांच्या विविध रोगांवरही टोमॅटो रस रामबाण आहे. 

     ताजे आणि पिकलेले टोमॅटो रोज साली सहित खाल्ल्यास जीर्ण बद्धकोष्ठ असलेल्या रुग्णास त्वरित आराम मिळतो. 

     टोमॅटोचे सूप  किंवा रस साखर  घालून पिल्यास पित्तजन्य विकार दूर होतात. 

     टोमॅटोमधे संत्र्या इतकेच पोषक घटक,आणि चवीला आंबट  गोड असल्यामुळे मुनुष्याच्या आतडी आणि जठराच्या व्याधी वर फार  उपयोगी आहे. 

     टोमॅटो उत्तम वायू नाशक आहे. त्यामुळे वात आणि पित्त प्रकृती च्या लोकांसाठी टोमॅटो रस अत्त्यंत फायदेशीर आहे. 

       ज्यांना नीट भूक लागत नाही. किंवा तोंडाची रुची जाते  त्यांनी टोमॅटो चे 2 काप करुन त्यावर मस्त्त सैंधव आणि धणे पूड टाकून खाल्ल्यास भूक वाढते. 

     मधुमेही रुग्णांनी रोज टोमॅटो किंवा रस घेतल्यास. पिष्टमय  पदार्थ कमी असल्यामुळे लघवीतील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. 

       ज्यांचे वजन दिवसेंदिवस वाढत असेल त्यांनी रोज सकाळी 2 टोमॅटो खावे, त्यामुळे वजन वाढणार नाही वाढत असलेले वजन कमी होते. 

      टोमॅटोचा  रस रोज चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर पडलेल्या सुरुकुत्या,  काळे डाग, वांग,  डोळ्या खालील काळी वर्तुळे, मुरूम पुटकुळ्या कमी होऊन चेहरा  प्रफुल्लित होते व चेहऱ्यावर चमक येते. 

कच्चे टोमॅटो   भाजून त्यावर मिरेपूड गूळ मिठ टाकून खाल्ल्यास फार रुचकर लागते व जेवताना तोंडाची रुची  वाढवते. 

      टोमॅटो पोषक असले तरी संधिवात, आम्लपित्त, आमवात शरीर सुजणे. मुतखडा,  असणाऱ्या  रुग्णांनी टोमॅटोचे सेवन करू नये किंवा ज्यांना आंबट पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो त्यांनी टोमॅटोचे सेवन कमी प्रमाणात करावे किंवा करू नये. 

    तज्ञांच्या मते टोमॅटो लिव्हर, जठर, आतडी, गुदा या अवयवांवर महत्वाचे कार्य करते 

टोमॅटो मधे सर्वच प्रकारचे व्हिटॅमिन आढळते, परंतु पिकलेल्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि सी  भरपूर प्रमाणात आढळून येते. 

टोमॅटो टाकून भात पण करता येतो 
टोमॅटो भात कसा करायचा खालील व्हिडिओ बघा 👇
"" Tomato a Day Keeps  The Doctor Away ""

Comments

Popular posts from this blog

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon