Posts

Showing posts with the label योगासन

पाठदुखीसाठी योगासन | Back Pain Relief Yoga in Marathi

Image
    पाठदुखीसाठी योगासन | Back     Pain Relief Yoga in Marathi आजच्या धावपळीच्या जीवनात पाठदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे.   जास्त वेळ बसून काम करणे, चुकीची बैठक, शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताणतणाव यामुळे अनेकांना पाठदुखीचा त्रास जाणवतो. योगासनांचा नियमित सराव केल्यास पाठदुखी कमी होण्यास मदत होते आणि शरीर लवचिक राहते. सूचना: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. तीव्र वेदना, दुखापत किंवा वैद्यकीय समस्या असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाठदुखी होण्याची सामान्य कारणे जास्त वेळ एकाच जागी बसणे चुकीची झोपण्याची किंवा बसण्याची पद्धत व्यायामाचा अभाव वजन वाढणे मानसिक ताणतणाव पाठदुखीसाठी उपयुक्त योगासन भुजंगासन (Cobra Pose)  भुजंग म्हणजे नाग या आसनाचे अंतिम स्थितीत शरीराचा आकार फणा काढलेल्या नागाप्रमाणे भासतो म्हणून या आसनास भुजंगासन असे म्हणतात. भुजंगासन मणक्याची लवचिकता वाढवण्यास मदत करते. यामुळे कंबरेवरील ताण कमी होतो आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. भुजंगासन कसे करावे: पोटावर झोपून, हातांच्या साहाय्याने छाती हळूहळू वर उचला. श्वास सामान्य...

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन

Image
            Yoga For Women         महिलांसाठी योगासने भाग 1                    पद्मासन                 (Lotus pose)  (संग्रहित चित्र )       योगाचा अभ्यास करताना मन स्थिर व चेहऱ्यावर हलकी स्माईल असेल तर दिवस काय संपूर्ण आयुष्य आनंदित घालवू शकतो. तर योगा करताना चेहऱ्यावर नक्कीच हसू ठेवा आणि आसनाला सुरवात करा           योगासन करताना सर्वात आधी शरीर व मन आसन करायला पूरक असले पाहिजे बऱ्याच वेळी मुली महिला योगा करायचा म्हणून जबरदस्ती योगा करायला जातात. जर तुमचं मन खरोखरच तयार असेल तरच करा.         सर्व प्रथम आज आपण पद्मासन कसे करतात व त्याचे फायदे याबद्दल जाणून घेऊ..                     पद्मासन   (संग्रहित चित्र )         पद्मासन हे बैठकीचे आसन आहे यात दोन्ही पायांचे तळवे कमळाच्या पाकळ्या...

निरोगी शरीरासाठी सर्वांगासन

Image
                 सर्वांगासन ( संग्रहित छायाचित्र )        निरोगी शरीरासाठी सर्वांगासन सर्वांत फायदेशीर आसन आहे, शरीराचे सर्व स्नायू व अवयवांना व्यायाम मिळत असल्यामुळे या आसनाला "सर्व+अंग+आसन=सर्वांगासन असं म्हणतात. आसन कसे करायचे कृती पाठीवर सरळ झोपा, दोन्ही पाय एकमेकांना जोडून हात शरीराला चिटकून ठेवा  नंतर श्वास रोखून धरून दोन्ही पाय कुठेही न वाकविता हळू हळू वर उचला. पाय जितके वर जातील तितके हळू हळू वर जाऊ द्या नंतर दोन्ही हात कोपरात वाकवून त्या हातांनी पाठीला आधार द्या या आधाराने पाय अजून उंच न्या. पाय, नितंब व पाठ सरळ रेषेत ठेवा. मान व खांदे जमिनीला टेकलेले असू द्या.त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपले बॅलेन्स जाईल किंवा पाय वर नेताना शरीर डगमगत असेल तर आपली दृष्टी पायाच्या अंगठ्यावर स्थिर ठेवा. त्यामुळे शरीराचा तोल जाणार नाही,याची काळजी घ्या. श्वासोच्छवास नेहमीच नॉर्मल ठेवा.आता संपूर्ण शरीराचा भार खांद्यावर येऊ द्या. ...