महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन

           Yoga For Women
        महिलांसाठी योगासने भाग 1
                   पद्मासन 
               (Lotus pose) 

(संग्रहित चित्र )
      योगाचा अभ्यास करताना मन स्थिर व चेहऱ्यावर हलकी स्माईल असेल तर दिवस काय संपूर्ण आयुष्य आनंदित घालवू शकतो. तर योगा करताना चेहऱ्यावर नक्कीच हसू ठेवा आणि आसनाला सुरवात करा

          योगासन करताना सर्वात आधी शरीर व मन आसन करायला पूरक असले पाहिजे बऱ्याच वेळी मुली महिला योगा करायचा म्हणून जबरदस्ती योगा करायला जातात. जर तुमचं मन खरोखरच तयार असेल तरच करा.

        सर्व प्रथम आज आपण पद्मासन कसे करतात व त्याचे फायदे याबद्दल जाणून घेऊ..


                   पद्मासन

 
(संग्रहित चित्र )
        पद्मासन हे बैठकीचे आसन आहे यात दोन्ही पायांचे तळवे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसतात म्हणून याला पद्मासन म्हणतात.
     
          या असनामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवणे आवश्यक आहे. पाठीचा कणा ताठ असेल तर शरीराला व मनाला स्थिरता लाभते 

         आसन कसे करावे-

 १) पाय पसरून एकमेकांना जुळवून बसावे.

 २) हात बाजूला ठेवावे.

 ३) उजव्या पायाचा तळवा हातांनी धरून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा.

 ४) नंतर डाव्या पायाचा तळवा उजव्या मांडीवर ठेवावा.

 ५) दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ज्ञानमुद्रेमध्ये जसे की हातांचे अंगठे व तर्जनी यांची टोके एकमेकांना चिकटवून बाकीची तिन्ही बोटे एकमेकांना चिकटलेली ठेवावी. हात ज्या त्या गुडघ्यावर उताणे ठेवावे.

 ६) दृष्टी समोर ठेवून बसावे.

 ७) ह्या स्थितीत पाच सेकंद बसावे.

 ८) नंतर क्रमाने पहिल्या स्थितीत येऊन बसावे. (दुसऱ्या बाजूने करण्यासाठी)

 ९) नंतर प्रथम डावे पाऊल उजव्या मांडीवर घेऊन व उजवे पाऊल डाव्या मांडीवर घेऊन (विरासन) व हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवून क्र. ७ प्रमाणे ५ सेकंद थांबावे.

 १०) पद्मासन क्रमशः सोडवून क्र. १ च्या स्थितीत यावे, फक्त १-१ पाय वर घेऊन दोन्ही बाजूने ह्या आसनाचा अभ्यास करणे जरूर असतो.

 

केव्हा, किती वेळ करावे

हॆ आसन करताना प्रत्येक बाजूने ५-५ सेकंद करावे. किंवा शक्तीनुसार ५ ते १० मिनिटेपर्यंत हळूहळू करू शकता जेवल्यानंतर 2 तासाने करावे.

 लाभ व फायदे

 हे आसन महिलांना अत्यंत उपयुक्त आहे. पायांतील सर्व दोष दूर होतात
मांड्यान मधील मेद कमी व्हायला मदत होते.

       पायांबरोबर मांड्या व योनीमार्गापर्यंतच्या सर्व नाड्यांचे शोधन होते. एवढे एक आसनसुद्धा महिलांच्या आरोग्यासाठी खूपच उपयोगी पडते.


पद्मासन केल्याने ओटीपोटाचा भाग मजबूत होण्यास मदत होते. हे क्षेत्र अधिक लवचिक बनवते, ज्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात 

 पचन सुधारणे

 पद्मासनामुळे ओटीपोटाच्या भागाला हलका मसाज होतो, ज्यामुळे पचनशक्ती वाढते. शिवाय, रक्त प्रवाह पोटाकडे वेवस्थित केला जातो ज्यामुळे पाचन तंत्र सुधारते.

        पद्मासानाचा स्नियमित सराव केल्यास बद्धकोष्ठतासारख्या पचनाच्या समस्या दूर होतात.

 शरीर लवचिक होण्यास मदत होते 

 
 समतोल आणि स्थिरता

 
 मासिक पाळीच्या समस्यांवर उपयुक्त

 पद्मासन योगामुळे पोटाच्या ओटीपोटाचा भाग मजबूत होण्यास मदत होते. हे हे क्षेत्र अधिक लवचिक बनवते, ज्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान पेटके येण्याचा धोका कमी होतो.

  पद्मासन केल्यास मूळ चक्र किंवा मूलाधार चक्र संतुलित करण्यास मदत करते. तुम्ही जमिनीवर बसलेले असल्याने, तुम्ही पृथ्वीशी जोडलेले आहात आणि स्थिरता राखता, ही या चक्राची आवश्यक वैशिष्ट्ये आहेत.
      

           तसेच पद्मासन मज्जातंतूच्या कार्याची ताकद वाढवते आणि त्यांना उत्तेजित करते.

आसन करताना घ्यावयाची काळजी 

 सुरुवातीस पद्मासन करताना दोन्ही पायांनी पद्मासन जमत नाही. त्यामुळे एकेका पायाने म्हणजेच अर्ध पद्मासन करावे साधारण ८ ते १५ दिवसांत ते नीट जमू लागते. 


 
(संग्रहित चित्र )

Pomaaly A
(Yoga Therapist)

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon