Posts

Showing posts with the label हत्ती पाय

निरोगी शरीरासाठी सर्वांगासन

Image
                 सर्वांगासन ( संग्रहित छायाचित्र )        निरोगी शरीरासाठी सर्वांगासन सर्वांत फायदेशीर आसन आहे, शरीराचे सर्व स्नायू व अवयवांना व्यायाम मिळत असल्यामुळे या आसनाला "सर्व+अंग+आसन=सर्वांगासन असं म्हणतात. आसन कसे करायचे कृती पाठीवर सरळ झोपा, दोन्ही पाय एकमेकांना जोडून हात शरीराला चिटकून ठेवा  नंतर श्वास रोखून धरून दोन्ही पाय कुठेही न वाकविता हळू हळू वर उचला. पाय जितके वर जातील तितके हळू हळू वर जाऊ द्या नंतर दोन्ही हात कोपरात वाकवून त्या हातांनी पाठीला आधार द्या या आधाराने पाय अजून उंच न्या. पाय, नितंब व पाठ सरळ रेषेत ठेवा. मान व खांदे जमिनीला टेकलेले असू द्या.त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपले बॅलेन्स जाईल किंवा पाय वर नेताना शरीर डगमगत असेल तर आपली दृष्टी पायाच्या अंगठ्यावर स्थिर ठेवा. त्यामुळे शरीराचा तोल जाणार नाही,याची काळजी घ्या. श्वासोच्छवास नेहमीच नॉर्मल ठेवा.आता संपूर्ण शरीराचा भार खांद्यावर येऊ द्या. ...