Benefits of Cumin

जर वारंवार उचकी लागत असेल तर जिऱ्याचे सेवन केल्याने उचकी बरी होते बाळंतीण बाई ने जिऱ्याचे सेवन केल्याने अंगावर दूध चांगले येते जिरे बाळंतीण साठी श्रेष्ठ औषधी आहे. जिरे आणि खडीसाखर याचे चूर्ण घेतल्यास स्त्रियांना नेहमी होणारा श्वेतप्रदर आणि रक्तप्रदर या विकारावर अत्यंत गुणकारी आहे. तज्ञांच्या मते जिऱ्याचे चूर्ण नियमित प्राशन केल्यास शरीरातील अतिरिक्त गर्मी कमी होऊन शरीराला थंडावा मिळतो जिऱ्याचे पाणी किंवा चूर्ण रोज घेतल्यास रातआंधळेपणा कमी होतो. जिऱ्याचे सेवनाने मूळव्याध बरी होण्यास मदत होते. जिऱ्याने रोज डोळे धुतल्यास डोळ्याचे तेज वाढून, डोळ्याचे बरेच विकार दूर होण्यास मदत होते. जिऱ्याचा पाण्यात मिठ टाकून घेतल्यास पोटातील कृमी बाहेर पडतात. जेवल्या नंतर पोट फुगल्यासारखे होणे किंवा गॅस होणे या सारख्या व्याधी वर देखील जिरे फार हितावह आहे.