केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी

केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी 


कढीलिंब सर्वांच्या परिचयाचे झाड आहे. कढी,  पोहे, चिवडा म्हटले की,  पहिले आठवते,  ते गोडलिंबाचे पान, कढीलिंब शिवाय पोह्यात, चिवड्यात मजाच नाही बाई !असे बऱ्याच महिला म्हणतात. असो!महिलांनाचा विषय  निघाला,  की केसांचा विषय हा निघतोच, माझ्या केसांना वाढच नाही किंवा माझे केस दिवसेंदिवस पातळ का होत आहेत? माझे केस फारच गळतात   हा प्रत्येक स्त्रियांचा यक्ष प्रश्न. 
           कढीलिंबाची उत्पत्ती स्थान भारत आणि श्रीलंका, परंतु  भारतात केरळ, बिहार, तामिळनाडू व  हिमालयात मोठ्या प्रमाणात कढीलिंबाची  झाडें आढळून येतात.
          कढीलिंबाची पाने फार  रुचकर असतात आणि त्यामध्ये जीवनसत्व ए  भरपूर असत, 
        आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरण्यात येणाऱ्या पदार्थां मधे, औषधी गुण असतातच.  त्यातूनच एक आहे कढीलिंब.हिंगाच्या फोडणी मधे जर,  कढीलिंबाची पान टाकली की, कढी, पोहे, विविध प्रकारच्या भाज्या  चविष्ट बनतात. 
कढिलिंबाच्या  पानात 66.3 % आर्द्रता, 6.1% प्रोटीन,1% चरबी, 16 टक्के कार्बोहाइड्रेट, 6.4 % फायबर 4.2 %खनिज असते.    
कढिलिंबाच्या नियमित सेवनाने  लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. 
 पचनक्रिया सुधारते. 
कढीलिंबाची पाने  खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं.
मधुमेही रुग्णाने नियमित सकाळी कढी पत्ता खाल्ल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. 

 केसांची समस्या असेल किंवा केस गळत असल्यास,  केस रुक्ष असतील,  तर कढीलिंब रोजच्या आहारात सामील करावा. कढीलिंब  खायला आवडत नसल्यास त्याची चटणी करुन ठेवावी,  व नियमित रोजच्या जेवणात चटणी चे सेवन करावे. 
 यात लोह तत्त्व, कॅल्शियम,  फॉस्फरस आणि जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असते . याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबते.

कढीलिंबाची चटणी 
साहित्य 


1)1पाव  कढीलिंबाची पान 
2)एक चमचा तेल 
3)1चमचा फुटाणे 
4)चवीपुरते मीठ 
5)मिरे पूड आवडत असल्यास टाकावी किंवा लाल मिर्ची पावडर अगदी चिमूट भर 

कृती 

सर्वप्रथम कढीलिंबाची पान धुवून स्वच्छ करावी, थोडावेळ एका स्वच्छ फडक्यावर सुकवून घ्यावी  आणि मग कढईत थोडे एक चमचा तेल टाकून परतावी, आणि खरपूस भाजून घ्यावी 
पान थंड झाल्यावर वरील सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सर मधून बारीक करावे 
चटणी तयार 

कढीलिंब सर्वत्र आढळून येणारी वनस्पती असल्यामुळे आपण तिचे रोज सेवन करायला काहीच हरकत नाही, तुम्हाला जर केस लांबसडक हवे असतील तर नियमित सेवन करा केसांच्या सगळ्या समस्यां वर गुणकारी अशी ही कढीलिंब चटणी आहे 
महत्वाचे 
 लांब आणि दाट  केसांसाठी 
1)कढिलिंबाच्या पानांची  पेस्ट करुन दह्यात मिसळून केसांना लावल्यास,  केसातील कोंडा  होण्याची समस्या दूर होते, केस गळणे थांबते.

2)कढीलिंबाची पाने उकळून, पाणी कोमट  झाल्यावर त्यात चमचा भर मध टाकून नियमित पिल्यास केस काळे आणि दाट होण्यास मदत होते. 
3)डोक्यात वारंवार खाज येत असेल तर कढीपत्ताची पान. कापूर, खोबरेल तेलात मिसळून त्या तेलाने डोक्याची मालिश करावी 
4) केस रुक्ष असतील तर डोक्यात खाज येते, त्या साठी 200 grm खोबरेल तेलात 2छोटे मध्यम आकाराचे  कांदे आणि अर्धा पाव कढीपत्त्याची पाने बारीक करुन तेलात उकळून घेणे, कांदा आणि कढीपत्ता काळा होईस्तोवर उकळून घेऊन मग ते तेल गाळून घेऊन एका स्वच्छ बॉटल मधे भरून घेऊन आठवड्यातून 2 वेळा डोक्याची मालिश करणे, 
       
केसांसाठी पोषक कढीलिंब चटणी रेसिपीचा विडिओ बघा


Nutritious / curry / sweet lemon / curry / curryleaves chutney for hair

 


 Curry is everyone's familiar tree.  Kadhi, Pohe, Chivda is said to be the first thing I remember.  Anyway! The topic of women came up, the topic of hair is coming up, my hair is not growing at all or why is my hair getting thinner day by day?  My hair is very thin, this is a big question for every woman.

 Curry is native to India and Sri Lanka, but in India, Kerala, Bihar, Tamil Nadu and the Himalayas are home to a large number of curry trees.

 Curry leaves are very tasty and rich in vitamin A.

 Everyday foods in your kitchen have medicinal properties.  Curry is one of them. If curry leaves are added to the asafoetida paste, curry, pohe, various types of vegetables become delicious.

 Cinnamon leaves contain 66.3% moisture, 6.1% protein, 1% fat, 16% carbohydrates, 6.4% fiber and 4.2% minerals.

 Regular consumption of curry leaves helps in reducing obesity.

 Improves digestion.

 Eating curry leaves helps in controlling cholesterol.

 Diabetes can be controlled if a diabetic patient eats curry leaves regularly in the morning.


 If you have hair problems or hair loss, if your hair is dry, then curry leaves should be included in your daily diet.  If you do not like to eat curry, make chutney of it and consume chutney in your regular daily meal.

 It is rich in iron, calcium, phosphorus and vitamins A and C.  Consumption of it stops the process of graying hair.


 Curry chutney

 Ingredients

 


 1) 1 loaf of curry leaves

 2) One tablespoon oil

 3) Roasted chana dal 1tsp 

 4) Salt to taste

 5) If you like ,  black pepper powder   add it or add a pinch of red chilli powder


 Action

 


 First wash and clean the curry leaves, dry them on a clean cloth for a while and then add a teaspoon of oil to the pan and fry it.

 When the leaf cools down, combine all the above ingredients and grind in a mixer

 Prepare the chutney

 


 Since curry is a ubiquitous plant, you should not consume it on a daily basis. If you want long hair, use it regularly. This curry chutney is a cure for all hair problems.

 Important

 For long and thick hair

 1) Apply curry leaves paste mixed with curd and apply on hair, it eliminates the problem of dandruff and stops hair loss.


 2) Boil curry leaves, add a teaspoon of honey when the water is warm and drink it regularly to help darken and thicken hair.

 Watch the video of nutritious curry chutney recipe for hair

Comments

Popular posts from this blog

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon