पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन

भुजंगासन पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन भुजंग म्हणजे सर्प. किंवा साप हे आसन पोटावर झोपून करावयाचे आहे या आसनामध्ये दोन्ही पाय एकमेकास जोडून असतात व दोन्ही पाय आणि नाभीपर्यंतचा भाग जमिनीस टेकलेला असतो , तर कमरेपासून मस्तकापर्यंतचा भाग वर उचललेला असतो. त्यामुळे ही आकृति नाग जसा त्याचा फणा काढुन असतो. तशी आकृती या आसनाच्या अंतिम स्थितीत दिसते म्हणून यास भुजंगासन किंवा सर्पासन असे नाव पडले या आसन स्थितीत आपण आपल्या पाठीच्या कण्याला मागच्या दिशेस वाकवतो. त्यामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो, आसनांमध्ये बरीचशी अशी आसने आहेत जी पाठीचा कणा लवचिक ठेवायला मदत करतात त्यातीलच हे एक आसन आहे. आसन कसे करायचे ( कृती ) 1)सर्व प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हात शरीराच्या बाजूस ठेवुन व पंजे आकाशाकडे करावेत. चेह...