पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन

                  भुजंगासन



पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन






भुजंग म्हणजे सर्प. किंवा साप हे आसन 


पोटावर झोपून करावयाचे आहे या 


आसनामध्ये दोन्ही पाय एकमेकास जोडून 


असतात व   दोन्ही पाय आणि 


नाभीपर्यंतचा भाग जमिनीस टेकलेला 


असतो , तर कमरेपासून मस्तकापर्यंतचा 


भाग वर उचललेला असतो. त्यामुळे ही 


आकृति नाग जसा त्याचा  फणा काढुन 


असतो.  तशी आकृती या आसनाच्या 


अंतिम स्थितीत दिसते म्हणून यास 


भुजंगासन किंवा सर्पासन असे नाव पडले  


या आसन  स्थितीत आपण आपल्या 


पाठीच्या कण्याला 


मागच्या  दिशेस वाकवतो. त्यामुळे पाठीचा 


कणा लवचिक बनतो, आसनांमध्ये बरीचशी 


अशी आसने आहेत जी पाठीचा कणा 


लवचिक ठेवायला मदत करतात त्यातीलच 


हे एक आसन आहे. 


आसन कसे करायचे ( कृती )





1)सर्व प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हात 


शरीराच्या बाजूस ठेवुन  व पंजे 


आकाशाकडे करावेत. चेहरा एका बाजूस 


ठेवावा. पायाचे पंजे एकमेकांजवळ 


जमिनीस पालथे टेकलेले असावेत.


2) प्रथम कपाळ जमिनीवर टेकवावेव दोन्ही


 हात कोपरात वाकवून एकमेकांजवळ व


 अंगठे बाजूस ठेवावेत. हातांचे कोपरे 


आतल्या बाजूस असावेत. हातांचे पंजे 


छातीच्या दोन्ही बाजूस जमिनीवर ठेवावेत.


3) तळहात जमिनीवर ठेवताना पंजा 


जमिनीला टेकलेला असावा. 


4) कपाळ जमिनिवर  ठेवून हळू हळू डोक 


वर करुन छताकडे पाहावे नंतर हनुवटी 


जेवढी पुढे वर नेता येईल तितकी न्यावी.


5) खांदे मागे नेत खांद्याची हाडे 


एकमेकांजवळ आणावीत.


6) नाभीपासून शरीराचा वरचा भाग उचलत 


मागे झुकवावा. ही भुजंगासनाची


अंतिम स्थिती.


7) या स्तिथीत 15 सेकण्ड राहावे किंवा 


अभ्यास झाल्यावर 1 मिनिट पर्यंत हे आसन 


करावे 


8) आसन सोडताना आधी पाठीचे स्नायू 


ढिले करावेत. मग पोटाचा वरचा भाग


खाली आणावा. मग छाती आणि खांदे 


खाली आणावेत. मानेचे आणि  खांद्याचे 


स्नायू ढिले करुन खाली आणावेत आणि  


हनुवटी जमिनीला स्पर्श करावी. 


हे आसन करताना  हातावर जोर देऊन नये 


आसनाचे फायदे


१. पाठीचे स्नायू आकुंचित झाल्यामुळे 


पाठीच्या कण्याचे स्नायू मजबूत होतात 


आणि रक्ताभिसरण सुरळीत होऊन पाठीचे 


विकार होत नाहीत. 


2) पोटावर ताण पडल्यामुळे पोटाचे विकार 


दूर होतात. 


3) गॅस, अपचन ढेकर येणे इत्यादी विकार 


दूर होतात. 


4) पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास 


मदत होते. 


5) घश्याचे विकारात आराम मिळतो. 


6)पाठ दुखी मधे आराम मिळतो 


7)टॉन्सिल्स ठीक होते. 


8)स्त्रियांच्या प्रदर रोगात लाभकारी 


9)कंबर लवचिक होऊन कमरेचा घेर कमी होते. 


10) दम्याच्या विकारात आराम मिळतो. 







Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन