मुरूम, चेहऱ्यावर सुरकुत्या,डार्क सर्कल, सर्व व्याधींवर गुणकारी आरोग्य वर्धक ताक

आरोग्य वर्धक ताक यशा सुरणामृतम सुखाय, तथा नराणां भुवि तक्रमाहू:| जसे की स्वर्गात देवांना अमृत प्रसन्नता देते त्याच प्रमाणे पृथ्वीवरील लोकांना ताक प्रस्सनता देते. रोग व्याधी पासुन मुक्त राहण्यासाठी ताकाचे सेवन रोज करणे आवश्यक आहे, जो ताकाचे नियमित सेवन करतो तो मनुष्य निरोगी राहतो, ताकापासून बनवलेली कढी अत्त्यंत पाचक असते, भाकरी आणि ताक याचा जर रोजच्या जेवणात समावेश केला तर शरीरातील अनेक रोगांचा नाश होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होते. मधुर ताक पित्त नाशक असून ते शरीराला पुष्टी देणारे आहे, पंजाब मधील लोक त्याची लस्सी बनवतात, लस्सी शरीरासाठी हितावह असून मधुर ताक, पित्त आणि शरीरातील उष्णता घालवते, आंबट ताक हे अग्नि दीपक असल्यामुळे, ते अन्नाची रुची निर्माण करते. रोजच्या आहारात ताकाचे सेवन अमृत सामान आहे. ताका मधे शीतलता देणारा गु...