एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू

भुलाबाईचा पाळणा एक लिंब झेलू बाई दोन लिंबं झेलू एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू पाचा लिंबांचा पाणोठा माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळं तोडी कमळाच्या पाठीमागे लपली राणी अगं अगं राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारिक वाळू तेथे खेळे चिल्लारी बाळू चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजले पाटावरच्या गादीवर निजविले निज रे निज रे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळीखाली उष्टया पत्रावळी चिंचेखाली पान सुपारी उद्या दुपारी.. गाणे बघण्या करीता click करा👇 , भुलाबाईची गाणी