मुरूम, चेहऱ्यावर सुरकुत्या,डार्क सर्कल, सर्व व्याधींवर गुणकारी आरोग्य वर्धक ताक

          आरोग्य वर्धक ताक 






       यशा  सुरणामृतम सुखाय,  
       तथा नराणां भुवि  तक्रमाहू:|
जसे की स्वर्गात देवांना अमृत प्रसन्नता देते त्याच प्रमाणे पृथ्वीवरील लोकांना ताक प्रस्सनता देते. 

   रोग व्याधी पासुन मुक्त राहण्यासाठी ताकाचे सेवन रोज करणे आवश्यक आहे, जो ताकाचे नियमित सेवन करतो तो  मनुष्य निरोगी राहतो,  ताकापासून बनवलेली कढी अत्त्यंत पाचक असते, भाकरी आणि ताक  याचा जर रोजच्या जेवणात समावेश केला तर शरीरातील अनेक रोगांचा नाश होऊन शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

      मधुर ताक पित्त नाशक असून ते शरीराला पुष्टी  देणारे आहे, पंजाब मधील लोक त्याची लस्सी बनवतात, लस्सी शरीरासाठी हितावह असून मधुर ताक,  पित्त आणि शरीरातील उष्णता घालवते, 
आंबट ताक हे अग्नि दीपक  असल्यामुळे, ते अन्नाची रुची निर्माण करते. 

रोजच्या आहारात ताकाचे सेवन अमृत सामान आहे. ताका मधे शीतलता देणारा गुणधर्म  असल्यामुळे तो पित्तप्रकोप शांत करतो. 

गाईच्या दुधाचे ताक प्यायल्याने  रक्तशुद्धी होण्यास मदत होते, 
ताक हे आतडी आणि जठरावर परिणाम करते त्यामुळे पचन संस्था सुधारण्यासाठी मदत होते आणि विषद्रव्ये बाहेर पडण्यास कार्य करते, आणि हृदय मजबूत बनते.

ज्यांचा जीव घाबरत असेल, पोट फुगीचा त्रास असेल किंवा अन्न पचन नीट होत नाही भूक लागत नाही, त्यांच्या साठी ताक हे अमृता सारखे आहे.

उन्हाळ्यात उन्हाळी चा त्रास होत असेल किंवा  लघवीत जळजळ होत असेल तर त्यावर ताक हे उत्तम औषध आहे. 

   ताज्या ताकात जिरे पुढे आणि सैवन्ध घालून पिल्याने मूळव्याध आणि ओटीपोटातील दुखणे दूर होते. 

रोज चेहऱ्यावर ताक लावल्याने मुरूम, पुटकळ्या,  मुरुमाचे डाग, डोळ्या खाली डार्क सर्कल  दूर होतात आणि चेहऱ्याचं  तेज वाढत. 

रोज ताकाचे सेवन करणार्यांना वृद्धावस्था उशिरा येते, चेहऱ्यावर  सुरकुत्या पडत नाहीत आणि पडल्या तरी त्या दूर होतात, त्वचा निरोगी आणि तेजस्वी बनून त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. 

नियमित जर 1 चमचा ताकामधे 1 चमचा टोमॅटोचा रस आणि चिमूटभर तांदूळ  पीठ किंवा बेसन पीठ लावल्यास चेहऱ्यावरील वांग दूर होण्यास मदत होते. 

असे हे गुणधर्मी ताक यामध्ये भरपूर प्रमाणात 'C' जीवनसत्व असल्यामुळे तसेच प्रोटीन आणि लोह इत्यादी घटक असल्याने ताक सर्व व्याधींवर उपयुक्त आहे.  चला  तर मग आपण आज पासूनच सुरवात करू या, ताकाचे सेवन करू या.


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन