भुलाबाईची गाणी, यादवराया राणी रुसून बैसली कैसी

भुलाबाईची गाणी यादवराया राणी घरास येईना कैसी यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासूबाई गेल्या समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला पाटल्याचा जोड देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासरे गेले समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला तिजोरीची चावी देतो तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी दीर गेले समजावयाला चला चला वहिनी अपुल्या घराला नवीन कपाट देतो तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी जाऊ गेली समजावयाला चला चला जाऊबाई अपुल्या घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी नणंद गेली समजावयाला चल चल वहिनी अपुल्या घराला चांदीचा मेखला देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी पती गे...