स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स unique kitchen tips
स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स
unique kitchen tips
आज आजीने तिच्या नातीला काही महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहे, नातीने म्हणजेच मनूने आजीला सरप्राईज द्यायच ठरवलं. की आजीला आज मस्त गरमा गरम साबुदाणा खिचडी करुन द्यावी, मग काय मनू ने मस्त्त शेंगदाणे भाजले, आणि गरमा गरमा शेंगदाण्याचे साल ती हाताने काढत होती, पण साल काही लवकर निघत नव्हते तितक्यात आजी स्वयंपाक घरात पाणी प्यायला आली, आणि बघते तर मनूताई मस्त्त शेंगदाण्याची साल काढत होती आणि ती साल काही लवकर निघत नव्हती, मनूचे हात सुद्धा गरम शेंगदाण्याने भाजत होते, आणि इकडे आजी, मनू हे काय करते आहे, ते चूपचाप बघत होती,
आणि मग काय मनूची चिडचीड सुरु झाली आणि मणुताई हात पाय आपटत स्वयंपाक खोलीतून डायरेक्ट बाहेर, मग ती आजीला म्हणाली, आजी, अग तू कशी ग शेंगदाण्या चे साल काढते तुझे हात नाही का ग भाजत? मग कुठे आजीने मनूला काही टिप्स सांगितल्या, आजी म्हणाली, " अग तू जर भाजलेले शेंगदाण्या मधे जर थोडे मीठ टाकले असतेना तर साल लवकर निघाली असती, या पुढे लक्ष्यात ठेव,
मग आजीने मनूला स्वयंपाक घरातल्या बऱ्याच टिप्स सांगितल्या आणि मनूने त्या तिच्या डायरीत लिहून ठेवल्यात, तुम्ही पण मनू सारखे लिहून घ्या बरं
शेंगदाणे भाजल्या नंतर त्यात थोडे मीठ टाकावे,साल लवकर निघते,
लिंबू लवकर वाळून कडक होऊ नये त्यासाठी लिंबाला थोडे खोबरेल तेल लाऊन फ्रीज मधे ठेवावे लिंबू एकदम ताजे राहतात आणि बरेच दिवस टिकतात.
टमाटे कडक राहण्या साठी, ते थोडावेळ थंड पाण्यात ठेवावे.
पराठे करताना त्यात थोडे बेसन पीठ टाकावे, पराठे रुचकर बनतात.
कांद्याचे भजे करताना एक चमचा कॉर्न फ्लोवर टाकले तर भजे कुरकुरीत होतात.
पुरी करताना कणकेत मोहन टाकावे, पुरी कुरकुरीत होते.
गुलाब जाम करताना खव्या मधे मैदा न टाकता (आटा) कणिक टाकावी.
साबुदाणा भिजवताना कोमट पाणी टाकावे साबुदाणा लवकर भिजतो आणि मऊशार होतो.
बटाटे उकडल्या नंतर, ते थोडावेळ थंड पाण्यात ठेवा, बटाट्याची साल लवकर निघते
मिक्सर पॉट मधे कधिकधी मिर्ची किंवा आले लसुण पेस्ट तशीच राहते आणि मग वाळून जाते, त्यासाठी मिक्सर पॉट मधे लिक्विड वॉशचे 2 थेंब आणि पाणी टाकून फिरवावे.
ThanQ🙏🙏🙏
ReplyDeletehttps://asyn24.blogspot.com/2021/05/blog-post.html
ReplyDelete