Posts

Showing posts with the label लिंबू

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू

Image
               भुलाबाईचा पाळणा              एक लिंब झेलू बाई दोन लिंबं झेलू                        एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू पाचा लिंबांचा पाणोठा माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळं तोडी कमळाच्या पाठीमागे लपली राणी अगं अगं राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारिक वाळू तेथे खेळे चिल्लारी बाळू चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजले पाटावरच्या गादीवर निजविले निज रे निज रे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळीखाली उष्टया पत्रावळी चिंचेखाली पान सुपारी उद्या दुपारी.. गाणे बघण्या करीता click करा👇 , भुलाबाईची गाणी