पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार
पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या
1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका.
2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका.
3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात.
4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते.
5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात.
6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते.
7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये.
8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला वेळ लागतो.
9. मसाल्यांचा हलका वापर करावा परंतु हळद, मिरी, दालचिनी याचा समावेश आहारात करावा हॆ मसाले रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.
10. गरम पेय – आलं-चहा, सूप, काढा यांचा वापर रोज करावा
पावसाळ्यातील विहार (Lifestyle)
1. पावसाळ्यात जर कपडे ओले झाले तर ओल्या कपड्यांत राहू नये – लगेच कोरडे कपडे घालावेत.
2. चिखल, साचलेलं पाणी, ओले बूट टाळावेत – जंतुसंसर्ग टाळण्यासाठी ओल्या किंवा जिथे पाणी साचले असतील तर त्या पाण्यात फिनाईल टाकावे.
3. डासांपासून बचाव करावा मच्छरदाणी , कॉइल, हर्बल ऑइल वापरावे.
4. हलका व्यायाम, करावा योगासन, प्राणायाम करावे – पण जास्त श्रमाचे व्यायाम टाळावेत.
5. स्वच्छता – घरात दमटपणा राहू नये म्हणून दार खिडक्या उघड्या ठेवाव्यात, सूर्यप्रकाश मिळाला तर चांगलं.
6. हात धुण्याची सवय करावी,कारण या काळात जंतुसंसर्ग (टायफॉइड, डेंग्यू, कॉलरा) जास्त होतो.
7. झोप पुरेशी घ्यावी – झोप पूर्ण झाली की रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.
8. पावसाळ्यात मॉर्निंग walk ला जाणे टाळावे, घरीच अंगणात 100 पाऊले चालवी
थोडक्यात : पावसाळ्यात "गरम, हलका, ताजा, पचायला सोपा आहार" घ्यावा आणि स्वच्छता, उष्णता व रोगप्रतिकारकशक्ती यावर भर द्यावा.
पावसाळ्यातील आठवड्याचा आहार तक्ता खालील प्रमाणे,
रोज सात्विक आहार घेतल्यास आरोग्य उत्तम राहते.
सोमवार🔱
सकाळी उठल्यावर – कोमट पाणी + व चिमूटभर हळद टाकून ते पाणी प्यावे
नाश्ता
मूग डाळीची खिचडी / पोहे + आलं-चहा
दुपारचे जेवण –
भात + वरण (मूगडाळ) + दुधीभोपळ्याची भाजी + १ फुलका +व एक सिझनल फळ किंवा ऐक डाळिंब हॆ फळ बाराही महिने उपलब्ध असते.
दुपारनंतर
आलं-तुळशीचा चहा
🌙 रात्री
ज्वारी/नाचणीची भाकरी + परवलची भाजी + काढा
मंगळवार
🌅 सकाळ
गरम पाणी + मध-लिंबू
🍵
नाश्ता –
उपमा / इडली + सूप
🥗
दुपार –
भात + मसूर डाळ + दोडका/गिलकीची भाजी + गाजर कोशिंबीर🌿
☕
संध्याकाळ – भाजलेल्या मक्याचे 🌽दाणे / सुप🥣
🌙 रात्री
फुलका + पनीर/टोफूची हलकी भाजी + आलं-चहा☕
बुधवार
🌅 सकाळ
कोमट पाणी + लसूण पाकळी
🍵 नाश्ता – ओट्स खिचडी / भाज्यांचा उपमा
🥗 दुपार
भात + वरण + दुधी/काकडी कोशिंबीर + फुलका
🥛🥒🍀
☕ दुपारनंतर – डाळिंब / सफरचंद
🍎🍏
🌙 रात्री – नाचणीची भाकरी + गवार भाजी + हळदी दूध
गुरुवार
🌅 सकाळ – तुळशी पानं + कोमट पाणी
🍵 नाश्ता
भाज्यांचे पराठे (थोडं तूप) + दही (कमी प्रमाणात, शक्यतो टाळावे)
🥗 दुपार
भात + हरभरा डाळ + दुधीभोपळ्याची भाजी + डाळिंब
☕ संध्याकाळ
आलं-चहा + भाजलेले हरभरे
🌙 रात्री
फुलका + परवल भाजी + गरम सूप
शुक्रवार
🌅 सकाळ
गरम पाणी + हळद + लिंबू
🍵 नाश्ता
पोहे + मूग स्प्राउट्स धान्य
🥗 दुपार
भात + वरण + गाजर-बीट कोशिंबीर + दोडका भाजी
☕ दुपार
सफरचंद / पेरू
🌙 रात्री
ज्वारी भाकरी + पनीर भाजी + आलं-चहा
शनिवार
🌅 सकाळ – कोमट पाणी + २ मनुके
🍵 नाश्ता
मूगडाळ ढोकळा / उपमा
🥗 दुपार
भात + मसूर डाळ + दुधी/पावटा भाजी + १ फुलका
☕ संध्याकाळ
सुप + भाजलेले मखाने
🌙 रात्री –
नाचणी भाकरी + गवार भाजी + काढा
रविवार
🌅 सकाळ
हळदीच पाणी + लसूण पाकळी
🍵 नाश्ता
थालिपीठ (हिरव्या भाज्यांचे) + सूप
🥗 दुपार
भात + वरण + गाजर-टोमॅटो कोशिंबीर + दुधी भाजी
☕ संध्याकाळ
डाळिंब रस / आलं-चहा
🌙 रात्री
फुलका + परवल भाजी + हळदी दूध
पावसाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी
पावसाळ्यात रोज किमान २ लिटर उकळलेले/कोमट पाणी प्यावे.
जास्त तळकट, आंबट, थंड पदार्थ टाळावेत.
हवे असल्यास मधूनमधून आलं-तुळशीचा काढा घ्यावा.
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment