Posts

Showing posts with the label हादगा

भुलाबाईची गाणी, यादवराया राणी रुसून बैसली कैसी

Image
              भुलाबाईची गाणी     यादवराया राणी घरास येईना कैसी यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासूबाई गेल्या समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला पाटल्याचा जोड देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासरे गेले समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला तिजोरीची चावी देतो तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी दीर गेले समजावयाला चला चला वहिनी अपुल्या घराला नवीन कपाट देतो तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी जाऊ गेली समजावयाला चला चला जाऊबाई अपुल्या घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी नणंद गेली समजावयाला चल चल वहिनी अपुल्या घराला चांदीचा मेखला देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी पती गे...

नणंदा भावजया दोघी जणी

Image
भुलाबाईची गाणी नणंदा भावजया दोघी जणी नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं आता माझा दादा येईल गं दादाच्या मांडावर बसेन गं दादा तुझी बायको चोरटी असेल माझी गोरटी घे काठी घाल पाठी घराघराची लक्ष्मी मोठी बाई लक्ष्मी मोठी.... गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी 👇Click करा भुलाबाईची गाणी