नारळी पौर्णिमा महत्व आणि नारळी भात

नारळी पौर्णिमा महत्व आणि नारळी भात सागरे सर्व तिर्थानी म्हणजेच नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे .आणि सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवाची पूजा. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो , तेव्हा नारळी पौर्णिमा हा उत्सव साजरा करतात. श्रावणात नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा श्रावणी पौर्णिमा या दिवशी कोळी बांधव व समुद्र किनारी राहणारे लोक सागराची पूजा करतात. या दिवशी सोन्याचा मुलामा असलेले नारळ सागर देवतेला अर्पण करतात. नारळ हे हिंदू धर्मात शुभ मानले जाते. त्यालाच आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो श्री म्हणजे लक्ष्मी, आणि फळ म्हणजे नारळ. श्रावणातील ही पौर्णिमा समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांसाठी आणि कोळी बांधवांसाठी एक उत्सव असतो, आणि ते हा उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदाने साजरा करतात. ...