नारळी पौर्णिमा महत्व आणि नारळी भात

नारळी पौर्णिमा महत्व आणि नारळी भात 



             सागरे सर्व तिर्थानी 

म्हणजेच नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर  जास्त पवित्र आहे .आणि सागराची  पूजा म्हणजेच वरुणदेवाची पूजा. 

पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो , तेव्हा नारळी पौर्णिमा हा उत्सव साजरा करतात. श्रावणात नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा श्रावणी पौर्णिमा या दिवशी कोळी बांधव व समुद्र किनारी राहणारे लोक सागराची पूजा करतात. या दिवशी सोन्याचा मुलामा असलेले नारळ सागर देवतेला अर्पण करतात. 

              नारळ हे हिंदू धर्मात शुभ मानले जाते. त्यालाच आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो श्री म्हणजे लक्ष्मी, आणि फळ म्हणजे नारळ. 

               श्रावणातील ही पौर्णिमा समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांसाठी आणि कोळी बांधवांसाठी एक उत्सव असतो, आणि ते हा उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदाने साजरा करतात. 

                नारळी पौर्णिमे पासुन  पावसाचा जोर कमी होतो आणि खवळलेला समुद्र शांत होतो त्यामुळे मासेमारी करणारे कोळी बांधव मनोभावे आपल्या दर्याराजाची पूजा करुन मासेमारी व्यवसायास सुरुवात करतात. 

                 सागराचा आणि कोळी बांधवांचा अतुट  संबंध असल्यामुळे ते नारळीपौर्णिमा हा सण मोठ्या थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरा करतात. सोन्याचा नारळ पालखीत ठेवून वाजत गाजत ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढुन समुद्र किनारी येऊन आपल्या लाडक्या दर्या राजाची मनोभावे पूजन करतात व नारळ अर्पण करुन दर्याराजाला आराधना करतात, हे  पर्जन्यवर्षावाने उधाण आलेल्या  वरून राजा शांत हो तुझ्या तुफानी  कोसळणाऱ्या सरी कमी कर, आणि हे दर्यादेवा शांत हो आणि तुझ्या खवळलेल्या तुफानी लाटा सौम्य होऊन आमचे वादळी आणि तुफानी लाटां पासुन रक्षण कर 

         रक्षाबंधनाचे महत्व 

रक्षाबंधन म्हणजेच श्रावण शुद्ध पौर्णिमा या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातात राखी बांधते व भाऊ हा बहिणीच्या सर्वोतपरी  रक्षणाची हमी देतो. 

           रक्षाबंधनाचा शाब्दिक अर्थ रक्षा करने असं होतो, आणि बंधन म्हणजे धागा. 

एका पौराणिक कथे नुसार 


               एकेकाळी देवगण आणि राक्षसगण यांच्यात युद्ध सुरु झाले युद्धातील पराभवाचा परिणाम म्हणुन देवतांनी  युद्धातील त्यांचे अधिकृत राज्य  गमावले होते, आपले राज्य परत मिळावे या उद्धेशाने देवराज इंद्रानी देवगुरु बृहस्पती कडून मदतीची याचना करायला सुरुवात केली. त्यानंतर भगवान गुरु बृहस्पतीनी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला एक मंत्र विधान केला 

येन बधो बळीराजा दानवन्द्रो महाबाला ह :

तेन तंवभवीवामी रक्षे मा चाल मा चाल :

इंद्रदेवाची बहीण इंद्राणीने या पूजे पासुन घेतलेले सूत्र (धागा) आपला प्रिय भाऊ इंद्राच्या  म्हणजेच इंद्रदेवाच्या मनगटावर बांधला ज्यामुळे इंद्राला युद्धामध्ये विजय मिळाला आणि त्याने गमावलेला राजपाठ त्याला परत मिळाला 

          या पौराणिक कथेतून हे स्पष्ट होते की साधा रेशमी धागा केवळ बहिणीचेच रक्षण, किंवा भावाचे रक्षण नाही तर गुरु आपल्या शिष्याच्या सलामतीची कामना  आणि त्याचे रक्षण करने हीच प्रार्थना करतात. 


बहनाने भाई की कलाई से प्यार बांधा है 

प्यार के दो तार से संसार बांधा है 



नारळी भात 


नारळा  मधे बरेच औषधीय गुण असल्यामुळे आपण नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतो हे काही खोटं नाही. 

श्रावण महिन्यात नारळी भात करुन खाण्याची प्रथा आहे, 

नारळी भात करण्यासाठी लागणारे साहित्य 

1)1वाटी तांदूळ. ( तांदूळ कुठलाही घ्या जो    तुमच्या कडे उपलब्ध असेल तो बासमती असेल तर उत्तमच )

2)2वाटी पाणी 

3)2 टी स्पून साजूक तूप 

4)पाऊण वाटी खोवलेला नारळ 

5)2 ते 3 लवंग 

6)वेलची पूड 

7)1वाटी बारीक केलेला गूळ 

8)थोडा केसर 

9)आवडीप्रमाणे  काजू, बदाम किशमिश. 

कृती 

तांदूळ  2 ते 3 वेळा स्वच्छ धूवून त्यातले पाणी काढुन थोडावेळ निथळत ठेवावे. गॅसवर एका पातेल्यात तूप टाकून त्यात 2 वाट्या उकळलेले पाणी आणि तांदूळ टाकून भात मऊसूत शिजू द्यावा, भात शिजल्यानंतर तो एका परातीत मोकळा काढुन ठेवावा. त्यानंतर एका पॅन मधे थोडे तूप टाकून त्यात बारीक केलेला गूळ, खोवलेला नारळ, वेलची पावडर,  केसर, काजू बदाम मनुका,  सगळे जिन्नस मिक्स करुन मग शिजलेला भात टाकायचा  व परतून  मंद आचेवर पाच मिनीट झाकण ठेवावे. भात तयार, आपल्या आवडी प्रमाणे तुम्ही त्यात अजून जिन्नस टाकू शकता जसे की अनार दाणे, मधुमक्का चे दाणे. टाकून बघा फार रुचकर लागतो हा भात, मी या पद्धतीने करते तुम्हीपण करुन बघा. 

Comments

Popular posts from this blog

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon