Posts

Showing posts with the label गॅस

पवनमुक्तासन करण्याचे फायदे

Image
पवनमुक्तासन     सर्व छायाचित्र संग्रहित  Pawanmuktasana (Wind Relieving Pose)  पवनमुक्तासन म्हणजे काय? म्हणजेच शरीरातील अपान वायू (गॅस) बाहेर टाकण्यासाठी मदत करणारे आसन. संस्कृत शब्द : पवन = वारा (गॅस), मुक्त = सोडवणे, आसन = योगाची मुद्रा हे आसन प्रामुख्याने पोट आणि पचन संस्थेसाठी फायदेशीर मानले जाते. पवनमुक्तासन हे पोटाच्या विकारांवर, जसे की गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांवर एक फायदेशीर आसन आहे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांची लवचिकता वाढते, पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. हे आसन करताना गुडघा छातीवर दाबला जातो, ज्यामुळे पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते.   पवनमुक्तासन करण्याची पद्धत 1. योग मॅटवर पाठ टेकून सरळ झोपा. 2. दोन्ही पाय सरळ ठेवा, हात शरीराच्या बाजूला ठेवा. 3. हळूहळू उजवा पाय गुडघ्यात दुमडून छातीवर आणा. 4. हातांनी गुडघा पकडून छातीवर दाब द्या. 5. डोके आणि मान वर उचलून नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. 6. श्वास रोखा (जितका आरामदायी वाटेल तितका) 7...

बहु्गुणी आले अद्रक

Image
          बहुगणी अद्रक / आले   भारतामध्ये सर्वत्र आल्याची लागवड केली जाते             आले हृदयरोग, तसेच हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आल्याला व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत म्हटले जाते. दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो. कोलेस्ट्राॅल असणाऱ्यांनी आले खाणे फायदेशीर ठरते.             जेवण करण्याआधी ऐक आल्याचा तुकडा मिठ आणि मिरे पूड लावून खाल्यास भूक चांगली लागते. तसेच अन्नाचे पचन होते          आल्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कफ व वायूचे रोग होत नाही.         आलेपाक करून रोज पाण्यात घालून सेवन केल्यास अपचन, उदररोग, पोटफुगने, पोटदुखी, मळमळ, वांती,पोटात गुरगुरणे या विकरावर उपयोग होतो         खोकला किंवा स्वास रोग असल्यास आल्याचा रस एक चमचा, लिबू रस ऐक चमचा आणि मिठ एकत्र करून घेतल्यास फायदा होतो.       अजीर्ण झाल्यास...

पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन

Image
                   भुजंगासन पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पाठदुखी साठी आसन भुजंग म्हणजे सर्प. किंवा साप हे आसन  पोटावर झोपून करावयाचे आहे या  आसनामध्ये दोन्ही पाय एकमेकास जोडून  असतात व   दोन्ही पाय आणि  नाभीपर्यंतचा भाग जमिनीस टेकलेला  असतो , तर कमरेपासून मस्तकापर्यंतचा  भाग वर उचललेला असतो. त्यामुळे ही  आकृति नाग जसा त्याचा  फणा काढुन  असतो.  तशी आकृती या आसनाच्या  अंतिम स्थितीत दिसते म्हणून यास  भुजंगासन किंवा सर्पासन असे नाव पडले   या आसन  स्थितीत आपण आपल्या  पाठीच्या कण्याला  मागच्या  दिशेस वाकवतो. त्यामुळे पाठीचा  कणा लवचिक बनतो, आसनांमध्ये बरीचशी  अशी आसने आहेत जी पाठीचा कणा  लवचिक ठेवायला मदत करतात त्यातीलच  हे एक आसन आहे.  आसन कसे करायचे ( कृती ) 1)सर्व प्रथम पोटावर झोपावे. दोन्ही हात  शरीराच्या बाजूस ठेवुन  व पंजे  आकाशाकडे करावेत. चेह...