बहु्गुणी आले अद्रक

         बहुगणी अद्रक / आले 

 भारतामध्ये सर्वत्र आल्याची लागवड केली जाते 
           आले हृदयरोग, तसेच हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आल्याला व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत म्हटले जाते. दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो. कोलेस्ट्राॅल असणाऱ्यांनी आले खाणे फायदेशीर ठरते. 
           जेवण करण्याआधी ऐक आल्याचा तुकडा मिठ आणि मिरे पूड लावून खाल्यास भूक चांगली लागते. तसेच अन्नाचे पचन होते 

        आल्याचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कफ व वायूचे रोग होत नाही.

        आलेपाक करून रोज पाण्यात घालून सेवन केल्यास अपचन, उदररोग, पोटफुगने, पोटदुखी, मळमळ, वांती,पोटात गुरगुरणे या विकरावर उपयोग होतो 

       खोकला किंवा स्वास रोग असल्यास आल्याचा रस एक चमचा, लिबू रस ऐक चमचा आणि मिठ एकत्र करून घेतल्यास फायदा होतो.

      अजीर्ण झाल्यास आल्याच्या रसात चिमूटभर सैधव टाकून थोडे लिंबू पिळावे व ते सेवन करावे.

       अर्धशीशीचा त्रास असणाऱ्यांनी आले व गूळ एकत्र करून त्याची पूरचुंडी करावी व त्यातून निघालेल्या रसाचे थेंब नाकात टाकावे, अर्धशीशीत फायदा होतो.

        वारंवार उलटीचा त्रास होत आसणाऱ्यांनी आल्याचा रस व कांद्याचा रस ऐक ऐक चमचा एकत्र करून घेतल्यास उलटी बंद होते.


हिवाळ्यात रोज आल्याचा चहा घेतल्यास सर्दी,खोकला, अंग दुखी, डोके दुखी होत नाही.

वायूचा त्रास, ढेकर येणे या विकरावर आल्याच्या रसात पुदिन्याचा रस मिसळून सेवन करावे अत्यंत फायसेशीर उपाय आहे.

निरोगी राहा, आनंदी राहा, मुख्य म्हणजे हसत राहा 😄

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन