Posts

Showing posts with the label नवरात्री

नणंदा भावजया दोघी जणी

Image
भुलाबाईची गाणी नणंदा भावजया दोघी जणी नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं आता माझा दादा येईल गं दादाच्या मांडावर बसेन गं दादा तुझी बायको चोरटी असेल माझी गोरटी घे काठी घाल पाठी घराघराची लक्ष्मी मोठी बाई लक्ष्मी मोठी.... गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी 👇Click करा भुलाबाईची गाणी

नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवेद्य

Image
    नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवद्य   ||या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता|| नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥      भारतात दरवर्षी धूम धडाक्यात साजरी होणारी नवरात्री या वर्षी मात्र कोरोनाच्या  सावटा मुळे लोकांचा उत्साह थोडा ओसरलेला दिसत  असला  तरी पण आपल दुःख विसरून सर्व भाविक  मोठ्या भक्ती भावाने देवीच्या आगमनाची तयारी करताहेत.  यंदाच्या वर्षी  निज अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जात आहे.  शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजीपासून नवरात्रारंभ होणार आहे. याच दिवशी सकाळी ०६ वाजून २७ मिनिटे ते १० वाजून १३ मिनिटांपर्यंत घटस्थापन करण्याचा मुहूर्त आहे. यानंतर सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल.         जाणकारांच्या मते   यावर्षी नवरात्रात  एक अद्भूत शुभ योग जुळून येत आहे.तो  म्हणजे  या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी शनी आणि गुरु आप आपले स्वामीत्व असलेल्या मकर आणि धनु राशी मधे विराजमान असतील.       हा...