Posts

Showing posts with the label विहार

चालण्याचे आरोग्यदायी फायदे दररोज चालल्याने होणारे 10 महत्त्वाचे लाभ

चालण्याचे आरोग्यदायी फायदे  दररोज चालल्याने होणारे 10 महत्त्वाचे लाभ नमस्कार आजच्या लेखात आपण चालण्याचे फायदे बघणार आहोत,तसेच चालणे का महत्वाचे आहे, आणि किती वेळ चालावे. चालल्याने तुमच्या आरोग्यात मोठा सकारात्मक बदल होऊ शकतो! हृदय निरोगी ठेवण्यापासून ते वजन नियंत्रणापर्यंत चालण्याचे अनेक फायदे आहेत. संपूर्ण लेख वाचा आणि आजपासून चालण्याची सवय लावा. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना व्यायामासाठी वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत चालणे हा सर्वात सोपा, सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. नियमित चालण्याची सवय शरीर आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर ठरते. चालणे का महत्त्वाचे आहे? चालणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे. यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची किंवा विशेष प्रशिक्षणाची गरज नसते. दररोज 30 ते 45 मिनिटे चालल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. चालण्याचे प्रमुख फायदे 1. हृदयाचे आरोग्य सुधारते नियमित चालल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. 2. वजन नियंत्रणात राहते चालल्याने कॅलरी खर्च होतात. संतुलित आहारासोबत नियमित चालण...

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा?

Image
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा? उन्हाळ्यात कडक ऊन त्यामुळे जास्त घाम येणे पाणी कमी पिणे आणि तिखट-तेलकट, चुकीच्या आहारामुळे शरीरातील पित्त वाढते, त्यामुळे उष्णता वाढते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते तसेच शरीरात थंडावा राहण्यासाठी कोणता आहार व विहार असावा हे आजच्या लेखात जाणून घेऊ या  घरगुती उपाय, डाएट टिप्स व आरोग्य सल्ला.  कडक ऊन्हा मुळे घाम येणे, तहान लागणे, अंगाची आग होणे, चक्कर येणे, लघवीत जळजळ होणे, घसा कोरडा होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अशा समस्या अनेकांना जाणवतात. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पित्तदोष वाढतो आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच या ऋतूत योग्य आहार (Diet) आणि विहार (Lifestyle) फार महत्त्वाचा असतो. 🥗 उन्हाळ्यात थंडावा देणारा आहार  1. पाण्याचे योग्य सेवन करणे दिवसातून 8–10 ग्लास पाणी प्या माठातले किंवा थंड  फ्रिजचे नाही पाणी प्या थोडे थोडे पण वारंवार पाणी पिणे चांगले  2. थंडावा देणारी फळे खावीत कलिंगड/ टरबूज खरबूज द्राक्षे संत्री, मोसंबी डाळिंब ही फळे शरीरातील उष्णता कमी करत...

सकाळी कोमट पाणी पिण्याचे संभाव्य ७ आरोग्यदायी फायदे

   सकाळी कोमट पाणी पिण्याचे संभाव्य ७ आरोग्यदायी फायदे      निरोगी जीवनशैलीसाठी सकाळच्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकी एक सोपी आणि नैसर्गिक सवय म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे. नॅचरोपथी (Naturopathy) पद्धतीत शरीराची नैसर्गिक शुद्धी आणि संतुलन राखण्यासाठी पाण्याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जणांचा अनुभव असा आहे की ही साधी सवय नियमित केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू शकतात.       खालील मुद्द्यांद्वारे आपण कोमट पाणी पिण्याचे काही संभाव्य फायदे जाणून घेऊया. 1️⃣ पचनक्रिया सुधारण्यास मदत सकाळी कोमट पाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपेत असताना शरीर विश्रांती अवस्थेत असते. सकाळी कोमट पाणी घेतल्याने आतड्यांची हालचाल (bowel movement) सुरळीत होण्यास सहाय्य होऊ शकते. नियमितपणे ही सवय लावल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. 2️⃣ शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास सहाय्य नैसर्गिक उपचार पद्धतीनुसार पाणी शरीरातील अपायकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करते. कोमट पाणी घेतल्याने घाम आणि ल...

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार

Image
पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी आहार आणि विहार  पावसाळा सुरु झाला की आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढतात हवामानातील बदल, दमटपणा, ओलसर वातावरण, जंतुसंसर्ग आणि पचनशक्ती कमी होते म्हणून या ऋतूत आहार आणि विहार याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा ते बघू या  1. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा जसे की मूगडाळ खिचडी, भात, वरण, फुलका. 2. सूप, उकडलेल्या भाज्या जास्त खाव्यात – गाजर, दुधी, परवल, दोडका. 3.पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घ्याव्यात कारण यामध्ये कीड, जंतू जास्त प्रमाणात असतात. 4. तूप, आलं/अद्रक लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करावा याने पचन सुधारते. 5. पोटाचे विकार टाळण्यासाठी उकळलेले किंवा कोमट पाणी प्यावे पोटाचे विकार टळतात. 6. पावसाळ्याच्या दिवसात दही व थंड पदार्थ टाळावेत, ते जर सेवन केले तर सर्दी, खोकला, पोटदुखी होऊ शकते. 7. फळे – डाळिंब, सफरचंद, पेरू, केळी खाणे योग्य आहेत. पण कापलेली, रस्त्यावरची फळे टाळावीत.फळे कधीही कापून ठेऊ नये. 8. वडे,भजे, पावभाजी, बटाटा वडे,तळलेले पदार्थ, फास्टफूड कमी करावे – कारण आर्द्रतेमुळे पचायला ...