उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा?

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा?


उन्हाळ्यात कडक ऊन त्यामुळे जास्त घाम येणे पाणी कमी पिणे आणि तिखट-तेलकट, चुकीच्या आहारामुळे शरीरातील पित्त वाढते, त्यामुळे उष्णता वाढते.


उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते तसेच शरीरात थंडावा राहण्यासाठी कोणता आहार व विहार असावा हे आजच्या लेखात जाणून घेऊ या 

घरगुती उपाय, डाएट टिप्स व आरोग्य सल्ला.


 कडक ऊन्हा मुळे घाम येणे, तहान लागणे, अंगाची आग होणे, चक्कर येणे, लघवीत जळजळ होणे, घसा कोरडा होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, अशा समस्या अनेकांना जाणवतात. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पित्तदोष वाढतो आणि त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच या ऋतूत योग्य आहार (Diet) आणि विहार (Lifestyle) फार महत्त्वाचा असतो.


🥗 उन्हाळ्यात थंडावा देणारा आहार


 1. पाण्याचे योग्य सेवन करणे


दिवसातून 8–10 ग्लास पाणी प्या

माठातले किंवा थंड  फ्रिजचे नाही पाणी प्या

थोडे थोडे पण वारंवार पाणी पिणे चांगले


 2. थंडावा देणारी फळे खावीत


कलिंगड/ टरबूज

खरबूज

द्राक्षे

संत्री, मोसंबी

डाळिंब

ही फळे शरीरातील उष्णता कमी करतात.या फळांचा रस प्या किंवा फोडी करून खाऊ शकता


 3. ताक, दही आणि लस्सी


दुपारी ताक पिणे फार फायदेशीर राहते

जिरे पूड, कोथिंबीर घालून ताक घ्या

सकाळी थोडे दही चालते (रात्री दही ताक  टाळा)


 4. पालेभाज्या आणि हलका आहार


दोडका, गाजर, काकडी, पडवळ, घोळीची भाजी, चिवळची भाजी उन्हाळ्यात भरपूर  खावी

भाजी वरण, भात, पोळी असा साधा आहार घ्यावा जास्त मसाले टाळावेत.

शक्यतो ताजे अन्न सेवन करावे शिळे अन्न खाऊ नये


 5. टाळावयाचे पदार्थ


तिखट, तेलकट, तळलेले पदार्थ

फास्ट फूड, जंक फूड

फार गार पेये (कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम जास्त प्रमाणात)


 उन्हाळ्यात योग्य विहार (Lifestyle)


 1. वेळेवर झोप आणि विश्रांती


रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा

दुपारी 20–30 मिनिटांची विश्रांती घ्या.

उन्हाळ्यात हलके कपडे घालावे सुती कपडे आणि हलक्या फिकट रंगाचे कपडे वापरावे.


 2. उन्हात जाणे टाळा


दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा

बाहेर जाताना टोपी, स्कार्फ वापरा उन्हात छत्रीचा वापर करावा.


3. थंडावा देणारे उपाय


पायांना आणि डोक्याला थंड पाणी

नारळाचे तेल डोक्याला लावणे

मातीच्या भांड्यातील पाणी पिणे 


4. हलका व्यायाम आणि योग


सकाळी लवकर चालणे

प्राणायाम, शीतली प्राणायाम करावा

जास्त घाम येणारा व्यायाम टाळावा.


उन्हाळ्यात घरगुती उपाय नक्की करा

कोकम सरबत

लिंबूपाणी (मीठ-साखर संतुलित)

सौंफ पाणी

गुलकंद


 निष्कर्ष


उन्हाळ्यात शरीरातील उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी थंडावा देणारा आहार, पुरेसे पाणी, योग्य विश्रांती आणि साधी जीवनशैली आवश्यक आहे. योग्य आहार-विहार पाळल्यास उन्हाळ्यातही शरीर ताजेतवाने आणि निरोगी राहते.



बऱ्याच जणांना प्रश्न पडतात त्याची उत्तरे पाहू


प्रश्न 1 उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते?


उन्हाळ्यात कडक ऊन, जास्त घाम, पाणी कमी पिणे आणि तिखट-तेलकट आहारामुळे शरीरातील पित्त वाढते, त्यामुळे उष्णता वाढते.


प्रश्न 2शरीर थंड ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?


कलिंगड, खरबूज, द्राक्षे, ताक, सौंफ पाणी, कोकम सरबत आणि पालेभाज्या हे पदार्थ शरीराला थंडावा देतात.


प्रश्न 3 उन्हाळ्यात कोणते पदार्थ टाळवेत?


फास्ट फूड, तिखट-तेलकट पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, जास्त चहा-कॉफी आणि आइसक्रीमचे अति सेवन टाळावे.


प्रश्न 4उन्हाळ्यात किती पाणी प्यावे?


दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. घाम जास्त येत असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे.उन्हातून आल्यावर एकदम पाणी पिऊ नये थोडे थांबून व नेहमी बसूनच पाणी प्यावे उभ्याने कधीही पाणी पिऊ नये, उभ्याने पाणी पिल्यास पायाचे त्रास होतात विशेषता: टाचेचे दुखणे वाढते.


प्रश्न 5 उन्हाळ्यात व्यायाम करावा का?


हो, पण हलका व्यायाम सकाळी लवकर करा. चालणे, प्राणायाम, योगासने योग्य ठरतात.


प्रश्न 6 घरगुती उपायांनी शरीरातील उष्णता कमी होते का?


हो, सौंफ पाणी, गुलकंद, लिंबूपाणी, कोकम सरबत यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.


धन्यवाद

🙏🏻🌹🙏🏻

Yoga &Naturo Beauty Clinic

9822363909

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon