तुळशीचे फायदे Tulsi Benefits आयुर्वेदातील अमृततुल्य औषधी
तुळशीचे फायदे Tulsi Benefits आयुर्वेदातील अमृततुल्य औषधी आज आपण तुळशीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत, रोगप्रतिकार शक्ती, सर्दी, खोकला, ताण तणाव आणि पचनासाठी तुळशी कशी उपयोग आहे हॆ आजच्या लेखात बघणार आहोत. तुळस ही भारतीय आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती मानली जाते. घराच्या अंगणात लावली जाणारी तुळस आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. 1. तुळस ही रोगप्रतिकारशक्ती वाढवते तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणून शरीराची immunity मजबूत करण्यास मदत करतात. 2. सर्दी-खोकल्यात उपयुक्त तुळशीची पाने उकळून काढा करून घेतल्यास सर्दी, खोकला आणि घसा दुखणे, खवखवणे यामध्ये आराम मिळू शकतो. 3. तणाव कमी करण्यास मदत तुळस मन शांत ठेवण्यास मदत करते. तुळशी चे नियमित सेवन केल्यास रोज सकाळी तुळशीचे पान खावे याने मानसिक तणाव कमी होऊ शकतो. 4. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर तुळस रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू...