तुळशीचे फायदे Tulsi Benefits आयुर्वेदातील अमृततुल्य औषधी

         तुळशीचे फायदे 

         Tulsi Benefits 

  आयुर्वेदातील अमृततुल्य औषधी



आज आपण तुळशीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत, रोगप्रतिकार शक्ती, सर्दी, खोकला, ताण तणाव आणि पचनासाठी तुळशी कशी उपयोग आहे हॆ आजच्या लेखात बघणार आहोत.


   तुळस ही भारतीय आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती मानली जाते. घराच्या अंगणात लावली जाणारी तुळस आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.


 1. तुळस ही रोगप्रतिकारशक्ती वाढवते


तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, म्हणून शरीराची immunity मजबूत करण्यास मदत करतात.


 2. सर्दी-खोकल्यात उपयुक्त


तुळशीची पाने उकळून काढा करून घेतल्यास सर्दी, खोकला आणि घसा दुखणे, खवखवणे यामध्ये आराम मिळू शकतो.


 3. तणाव कमी करण्यास मदत


तुळस मन शांत ठेवण्यास मदत करते. तुळशी चे नियमित सेवन केल्यास रोज सकाळी तुळशीचे पान खावे याने मानसिक तणाव कमी होऊ शकतो.


 4. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर


तुळस रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, जीव घाबरणे, हृदय अचानक धडधड करने इत्यादी वर अत्यंत उपयोगी


 5. रक्तशुद्धी


तुळस रक्तातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे त्वचा व आरोग्य दोन्ही सुधारते.


⚠️ सूचना


गर्भवती महिला किंवा गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी तुळस औषध म्हणून वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


🔎 निष्कर्ष


तुळस ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून योग्य प्रमाणात वापरल्यास ती दैनंदिन आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.


धन्यवाद 

🙏🏻🌺🙏🏻

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon