उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?🤔
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?🤔 उन्हाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? टॅनिंग, पिंपल्स आणि कोरडेपणापासून बचाव करण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा! निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी योग्य काळजी घ्या. उन्हाळ्यात त्वचेची संपूर्ण काळजी घेण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय उन्हाळ्यात तापमान वाढते, 🌄घाम जास्त येतो आणि सूर्याच्या तीव्र 🌅किरणांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, टॅनिंग, पिंपल्स, घामोळे आणि रॅशेस यांसारख्या समस्या वाढतात. योग्य काळजी घेतली तर त्वचा ताजीतवानी आणि निरोगी राहू शकते. 🥛1. भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात शरीरातून घामामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. दिवसाला किमान 8–10 ग्लास पाणी प्या. नारळपाणी, ताक, लिंबूपाणी उसाचा रस पन्ह,यांचा आहारात समावेश करा. 🧴 2. सनस्क्रीन वापरणे आवश्यक घरातून बाहेर पडण्यापूर्वी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा. दर 2-3 तासांनी पुन्हा लावणे फायदेशीर ठरते. 3. चेहरा स्वच्छ ठेवा दिवसातून 2 वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. घामामुळे त्वचेवर जमा होणारी घाण साफ करणे आवश्यक आहे. 🥒 4. नैसर्गिक फेसपॅक वापरा काकड...