incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी

     प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी 



( सर्व चित्र संग्रहित )

      आई झाल्यानंतर अनेकदा महिलांना स्तनातून दूध येत नसल्याने त्रास होतो. मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.


      बाळाला जन्म दिल्यानंतर, स्त्रीचे शरीर स्तनपानासाठी तयार होते. अशा परिस्थितीत, स्तनातून पुरेसे दूध मिळणे खूप महत्वाचे आहे. कारण बाळाला केवळ आईच्या दुधातूनच पोषण मिळते. मात्र, प्रसूतीनंतर काही महिलांना स्तनामध्ये दूध कमी येत असल्याची तक्रार असते. 


     अनेकदा महिलांना ऐक समस्या भेडसावत असते स्तनातून दूध येत नसल्याने बऱ्याच महिलांना मानसिक त्रास होतो.  बाळाला दूध कसे मिळेल त्याचे पोट भरेल का? मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकता.


     खारीक बदाम खिर 



प्रसूती नंतर दूध वाढवण्यासाठी खारीक बदामची खिर करुन खावी यात खसखस पण टाकू शकता खसखस टाकून खिर केल्यास जास्त फायदा होतो.


अळीव / आहाळू 



अळीव ची खिर करून पिल्यास दूध वाढण्यास मदत होते. 

ऐक चमचा अळीव  थोड्या पाण्यात अर्धा तास पाण्यात भिजत घालावे व नंतर ते उकळून  त्यात दूध व साखर टाकून त्याची खिर बनवून ती रोज प्यावी.


ओवा 



ओवा आईचे दूध वाढविण्यात मदत करू शकतो. यासाठी एक किंवा दोन चमचे ओवा  रात्रभर पाण्यात भिजत घालून . दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून प्या.



जिरे 



जिरे भाजून त्याची पूड करावी व गुळा बरोबर ती खावी किंवा जिरे रात्र भर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी गाळून त्यात चवीपुरता गूळ घालून ते पाणी प्यावे.


सोप ( बडीशेप )



पहिल्यांदा आई झालेल्या महिलांना दूध कमी होत असल्याची तक्रार असेल तर त्यांच्यासाठी बडीशेप खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे आईचे दूध वाढण्यास मदत होते.

.



मेथीचे दाणे 



 मेथीचे दाणे फायटोस्ट्रोजेनचा चांगला स्रोत आहेत. एक चमचा मेथी दाणे एक कप पाण्यात उकळवा. व त्यात थोडे मध टाकून दिवसातून  दोन ते तीन वेळा ते प्या. 


बदामाचे दूध




बदामाच्या दुधात ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर असते जे आईच्या दुध वाढवण्यास मदत करते. 


खजूर



हे खाल्ल्याने आईचे दूध वाढण्यासही मदत होते. खजूरमध्ये प्रोलॅक्टिन हार्मोनची क्रिया वाढवण्याचे गुण असतात. आईचे दूध वाढवण्यासाठी ८-१० खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी बिया काढून पाणी किंवा दुधात बारीक करा. यानंतर हे मिश्रण एका ग्लास कोमट दुधात मिक्स करुन प्या असे रोज केल्यास दूध वाढण्यास मदत होते.


डाळी 


डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. त्यात फायबर आणि लोह देखील असते. नवीन माता मध्ये दुधाची कमतरता दूर करू शकते. 


मुग डाळ 



कोंब आलेली मुग डाळ रोज 1वाटी खावी शिवाय त्यात सैधव थोडी मिरी पावडर आणि एकदोन थेंब लिंबू रस (sikp) करू शकता.टाकून सेवन करावे.


शतावरी चूर्ण 


शतावरी चूर्ण रोज दुधाबरोबर सेवन करावे 1चमचा शतावरी पावडर ऐक कप दुधात मिक्स करून घ्यावे.


शतावरीच्या मूळ्या 


शतावरीच्या मूळ्या ठेचून त्या उकळून काढा करून पिल्यास दूध वाढते.



लेख आवडल्यास like करा 

धन्यवाद 


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन