मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा
ज्ञानमुद्रा
ज्ञानमुद्रा करताना अंगठ्याची टोक आणि तर्जनीचे टोक यांनी परस्परांना स्पर्श करावा
. ज्ञानमुद्रा करताना शक्यतो पद्मासन स्थितीमध्ये बसूनच ज्ञानमुद्रा करावी कुठलीही मुद्रा तुम्ही केव्हाही करू शकता.
आज ज्ञानमुद्रा याबद्दल माहिती घेऊया
ज्ञानमुद्राच्या सरावाने स्नायू आणि मस्तीष्कला पुष्कळ फायदा होतो.
अंगठा हे बुद्धीचे केंद्र आहे तर्जनीने जर तिच्यावर दाब दिला गेला तर मस्तकामध्ये असणारे पिच्युटरी आणि पीनियल एंड्राइड नावाच्या दोन ग्रंथी असतात त्या दोन ग्रंथी उत्तेजित होतात. त्यामुळे शांत निद्रा येते तसेच मादक द्रव्याच्या व्यसनातून मुक्त होण्यास मदत मिळते.
ज्ञान मुद्रा मस्तकाच्या ज्ञानतंतूंना सक्रिय बनवते, व मन शान्त राहण्यास मदत होते आणि ज्ञानाचा विकास होतो
ज्ञानमुद्रा केल्याने मानसिक एकाग्रता स्मरणशक्ती आणि प्रसन्नता वाढवते तसेच अध्यात्मिकता, स्नायू संस्थेची क्षमता वाढविते.
मानसिक संतुलन,वेडेपणा, क्रोध आळशीपणा आणि थकवा नाहीसा होतो चंचलता आणि व्याकुलता दूर होते.
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची भीती मानसिक विकार किंवा काही विद्यार्थी अभ्यासाचा ताण घेतात. ज्ञानमुद्रा केल्याने हा सर्व त्रास नाहीसा होतो
निद्रानाशाच्या विकारात ज्ञानमुद्रा रामबाण उपाय आहे ज्याला जास्त झोप येते त्यांची झोप संतुलन होते. व ज्यांना झोपच येत नाही त्यांना शांत झोप लागण्यास मदत होते.
ज्ञानमुद्रा नियमित केल्यास डोकेदुखी नाहीसी होते तसेच ज्यांना मायग्रेन सारखे आजार आहेत ते बरे होऊ शकतात.
जी व्यक्ती तापट स्वभावाची किंवा नेहमी छोट्या छोट्या कारणावरून जर चिडचिड करत असेल तर त्यांनी सुद्धा ही ज्ञानमुद्रा करावी,ज्ञानमुद्रा करता करता जर आपल्या इष्ट देवतेचे चिंतन केले तर चिडचिडपणा आणि तापट स्वभावावर नियंत्रण मिळवता येतं.
( Arogya sadhana yoga & Naturo beauty clinic )
🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment