नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवेद्य

    नवरात्री चे नऊ रंग आणि नऊ नैवद्य 

 ||या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता||
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

     भारतात दरवर्षी धूम धडाक्यात साजरी होणारी नवरात्री या वर्षी मात्र कोरोनाच्या  सावटा मुळे लोकांचा उत्साह थोडा ओसरलेला दिसत  असला  तरी पण आपल दुःख विसरून सर्व भाविक  मोठ्या भक्ती भावाने देवीच्या आगमनाची तयारी करताहेत. 

यंदाच्या वर्षी  निज अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जात आहे. 

शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजीपासून नवरात्रारंभ होणार आहे. याच दिवशी सकाळी ०६ वाजून २७ मिनिटे ते १० वाजून १३ मिनिटांपर्यंत घटस्थापन करण्याचा मुहूर्त आहे. यानंतर सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल.

        जाणकारांच्या मते   यावर्षी नवरात्रात  एक अद्भूत शुभ योग जुळून येत आहे.तो  म्हणजे  या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी शनी आणि गुरु आप आपले स्वामीत्व असलेल्या मकर आणि धनु राशी मधे विराजमान असतील.
      हा  योग तब्बल ५८ वर्षांनी जुळून येतो  आहे. या आधी  १९६२ मध्ये असा योग जुळून आला होता. यंदाच्या नवरात्राचे वैशिष्ट्य काय असेल, नवरात्रात देवीच्या कोणत्या नऊ रुपांचे पूजन केले जाईल  किंवा  नवरात्रीत  नऊ रंग  कोणते असतील?  नऊ दिवस कोणते नैवेद्य दाखवणे शुभ मानले जातील, हा प्रश्न सर्वांनाच पडतो आहे तर आपण  ते जाणून घेऊया…


     शारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते.
      दिवस आणि देवीच्या नऊ रुपांच्या पूजनाविषयी जाणून घेऊया...

- १७ ऑक्टोबर : शैलपुत्री देवीचे पूजन - घटस्थापन

- १८ ऑक्टोबर : ब्रह्मचारिणी देवीचे पूजन

- १९ ऑक्टोबर : चंद्रघटा देवीचे पूजन

- २० ऑक्टोबर : कुष्मांडा देवीचे पूजन

- २१ ऑक्टोबर : स्कंदमाता देवीचे पूजन

- २२ ऑक्टोबर : कात्यायणी देवीचे पूजन

- २३ ऑक्टोबर : कालरात्रि देवीचे पूजन

- २४ ऑक्टोबर : महागौरी देवीचे पूजन

- २५ ऑक्टोबर : सिद्धिदात्री देवीचे पूजन

        असे मानले जाते की, जर नवरात्रात देवीच्या विविध रुपांचे पूजन करुन त्यांना प्रिय असलेल्या रंगांचा आणि  विशिष्ट प्रकारचा नैवेद्य जर देवीला नऊ दिवस अर्पण केला तर देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त होतात.

1)पहिला दिवस : गायीचे शुद्ध तूप अर्पण करावे.

2) दुसरा दिवस : साखर अर्पण करावी.

3) तिसरा दिवस : दूध किंवा खीर अर्पण करावी.

4) चौथा दिवस : मालपुवा अर्पण करावा.

5)पाचवा दिवस : केळी अर्पण करावी.

6)सहावा दिवस : मधाचा नैवेद्य दाखवावा.

7)सातवा दिवस : गुळ अर्पण करावा.

8)आठवा दिवस : नारळ अर्पण करावा.

9) नववा दिवस : तीळ अर्पण करावेत.

      नवरात्रीत किंवा दैनंदिन व्यवहारात सदर रंगांचा समावेश केल्यास शुभ लाभदायक परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते.

     शारदीय नवरात्रात देवीच्या नऊ रुपांना प्रिय असलेल्या रंगांना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्या त्या दिवशी संबंधित रंगाची वस्त्रे परिधान करावी 

1)शैलपुत्री देवी : पिवळा रंग

2)ब्रह्मचारिणी देवी : हिरवा रंग

3)चंद्रघटा देवी : करडा  रंग

4) कुष्मांडा देवी : नारिंगी रंग

5) स्कंदमाता देवी : पांढरा रंग

6) कात्यायणी देवी : लाल रंग

7)कालरात्रि देवी : निळा रंग

8) महागौरी देवी : गुलाबी रंग

9) सिद्धिदात्री देवी : जांभळा रंग

        अश्या प्रकारे जर आपण नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रुपाचे पूजन केले. तर  नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते . तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.


नवरात्रीची आरती


अश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो।

प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो। मूलमंत्रजप करुनि भोंवते रक्षक ठेवूनी हो। ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करितीहो॥ १॥ 

उदो बोला उदो अंबाबाई माऊलिचा हो। उदोकारे

गर्जती काय महिमा वर्णूं तिचा हो॥ धृ०॥ द्वितीयेचे दिवशीं

मिळती चौसष्ट योगिनी हो ॥ सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची

जननी हो॥ कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो। उदोकारे

गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥ उदो० ॥२॥ तृतीयेचे

दिवशी अंबे शृंगार मांडिला हो। मळवट पातळ चोळी कंठी

हार मुक्ताफळां हो। कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो।

अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो० ॥३॥

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो। उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो। पूर्ण कृपें तारिसी जगन्माते मनमोहिनी हो। भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो। उदो० ॥४॥ 

पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो। अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो। रात्रींचे समयी करिती जागरण हरिकथा हो। आनंदे प्रेम तें आलें सद्भावें कीड़तां हो॥ उदो०॥५॥ 

षष्ठींचे दिवशी भक्तां आनंद वर्तला है। घेऊनी दिवट्या हस्तीं हर्ष गोंधळ घातला हो । कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळां हो। जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळां हो॥। उदो०।।६॥ 

सप्तमीचे दिवशी सप्तशंगडावरी हो। तेथे तूं नांदसी भोवतीं पुष्पें नानापरी हो। जाई जुई शेवंती पजा रेखियली बरवी हो॥ भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो॥ उदोo||७॥ 

अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी हो। सह्याद्रीपर्वतीं राहिली उभी जगजननी हो। मन माझें मोहिले शरण आलों तुजलागुनी हो। स्तनपान देऊनी सुखी केले अंत:करणी हो। उदो०॥८॥ 

नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणें हो। सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करूनी हो। षड्रस अन्नें नैवेद्यासी अर्पियलीं भोजनीं हो।॥ आचार्यब्राह्मणां तृप्त केले कृपेंकरूनी हो ॥ उदो०॥१॥ 

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो। सिंहारूढ करिं दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनि हो। शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणीं हो॥ विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो॥ उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो।॥ १० ॥






Comments

Popular posts from this blog

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon