पवनमुक्तासन करण्याचे फायदे

पवनमुक्तासन    
सर्व छायाचित्र संग्रहित 
Pawanmuktasana (Wind Relieving Pose) 

पवनमुक्तासन म्हणजे काय?

म्हणजेच शरीरातील अपान वायू (गॅस) बाहेर टाकण्यासाठी मदत करणारे आसन.

संस्कृत शब्द : पवन = वारा (गॅस), मुक्त = सोडवणे, आसन = योगाची मुद्रा


हे आसन प्रामुख्याने पोट आणि पचन संस्थेसाठी फायदेशीर मानले जाते.
पवनमुक्तासन हे पोटाच्या विकारांवर, जसे की गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांवर एक फायदेशीर आसन आहे. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते, आतड्यांची लवचिकता वाढते, पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. हे आसन करताना गुडघा छातीवर दाबला जातो, ज्यामुळे पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते. 

 पवनमुक्तासन करण्याची पद्धत

1. योग मॅटवर पाठ टेकून सरळ झोपा.

2. दोन्ही पाय सरळ ठेवा, हात शरीराच्या बाजूला ठेवा.

3. हळूहळू उजवा पाय गुडघ्यात दुमडून छातीवर आणा.

4. हातांनी गुडघा पकडून छातीवर दाब द्या.


5. डोके आणि मान वर उचलून नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा.


6. श्वास रोखा (जितका आरामदायी वाटेल तितका)


7. हळूहळू श्वास सोडत डोके खाली आणा आणि पाय परत सरळ करा.


8. हीच क्रिया डाव्या पायाने करावी व नंतर दोन्ही पायांनी एकत्र करा.


आसन करण्याचा कालावधी

सुरुवातीला प्रत्येक बाजूला 15–20 सेकंद.

नंतर हळूहळू 30–60 सेकंद धरून ठेवू शकता.

हॆ आसन तुम्ही 3 ते 5 वेळा करू शकता 

आसनाचे फायदे खूप प्रभावी आहे 

1. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन कमी होण्यास मदत.


2. पोटातील अवयवांना मसाज मिळतो पचन सुधारते.


3. पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते 


4. कंबर आणि पाठदुखीवर खूप फायदेशीर आहे हॆ आसन.


5. रक्ताभिसरण सुधारते.


6. जांघांच्या स्नायूंना बळकटी मिळते 


7. मानसिक ताण कमी करून मन शांत होते.



आसन करताना घ्यावयाची काळजी 

पोटात शस्त्रक्रिया झालेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भवती स्त्रियांनी हे आसन टाळावे.

हृदयविकार, उच्च रक्तदाब, हर्निया, पाठीचा गंभीर त्रास असल्यास करू नये.

रिकाम्या पोटी (भोजनानंतर किमान 3–4 तासांनी) आसन करणे आवश्यक आहे.



या आसनाचे दोन प्रकार आहेत 

1. एक पाय पवनमुक्तासन – एकावेळी एकच पाय छातीवर आणणे.


2. दोन पाय पवनमुक्तासन – दोन्ही पाय छातीवर आणणे.

हे आसन रोज केल्यास पचन संस्था मजबूत राहते आणि शरीर हलके-फुलके वाटते.



Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन