निरोगी शरीरासाठी सर्वांगासन


                सर्वांगासन


( संग्रहित छायाचित्र )


       निरोगी शरीरासाठी सर्वांगासन सर्वांत फायदेशीर आसन आहे, शरीराचे सर्व स्नायू व अवयवांना व्यायाम मिळत असल्यामुळे या आसनाला "सर्व+अंग+आसन=सर्वांगासन असं म्हणतात.



आसन कसे करायचे


कृती




पाठीवर सरळ झोपा, दोन्ही पाय एकमेकांना जोडून हात शरीराला चिटकून ठेवा



 नंतर श्वास रोखून धरून दोन्ही पाय कुठेही न वाकविता हळू हळू वर उचला. पाय जितके वर जातील तितके हळू हळू वर जाऊ द्या


नंतर दोन्ही हात कोपरात वाकवून त्या हातांनी पाठीला आधार द्या या



आधाराने पाय अजून उंच न्या. पाय, नितंब व पाठ सरळ रेषेत ठेवा.


मान व खांदे जमिनीला टेकलेले असू द्या.त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपले बॅलेन्स जाईल किंवा पाय वर नेताना शरीर डगमगत असेल तर आपली दृष्टी पायाच्या अंगठ्यावर स्थिर ठेवा. त्यामुळे शरीराचा तोल जाणार नाही,याची काळजी घ्या. श्वासोच्छवास नेहमीच नॉर्मल ठेवा.आता संपूर्ण शरीराचा भार खांद्यावर येऊ द्या.


आता मनातल्या मनात 15सेकंड मोजून  या स्थितीत थांबा  नंतर हळूहळू पाय खाली घ्या.



तोल जाणार नाही असा अंदाज आल्यावर हाताचा आधार काढून घ्या व आसनाच्या पूर्वस्थितीत या.



सर्व आजारावर हे आसन अतिशय महत्त्वाचे आहे. 



फायदे


या आसनाचा प्रामुख्याने थायरॉईड ग्रंथीवर  परिणाम होता. तसेच अन्य ग्रंथीवर सुद्धा चांगला परिणाम होऊन अंतःस्त्रावी ग्रंथीतून योग्य प्रमाणात स्त्राव पाझरण्यात मदत होते.


सर्वांगासनाने  शरीर निरोगी, बलवान व धष्टपुष्ट होते. व शरीराचा  उत्साह

कायम राहतो, तसेच पचन, पुनरुत्पादन उत्सर्जन, अस्थि इ. संस्थांसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त असून या संस्थांतील विकार दूर करणारे व त्यांची कार्यक्षमता वाढविणारे असे हॆ आसन आहे.


सर्वांगासन रोज केल्याने अभ्यासात ज्या विध्यार्थीचे मन लागत नाही किंवा अभ्यासाचा कंटाळा येतो त्या मुलांनी हॆ आसन रोज करावे त्यामुळे मुलांची बुद्धी वाढते. व मानसिक विकार दूर होतात.


या आसनाने स्वप्नदोष नाहीसा होऊन ब्रह्मचर्यपालनास अत्यंत मदत होते.


अध्यात्मच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास जर कुंडलिनी जागृत करायची असेल तर सर्वांगासन नियमित केल्यास कुंडलिनी जागृत होण्यास मदत होते 


जर कोणत्याही कारणाने पायावर सूज येत असेल तर सर्वांगासन केल्याने पायावरची सूज कमी होते.


 नियमित सकाळ संध्याकाळ पाच सहा वेळा सर्वांगसानाचा अभ्यास केल्यास मानसिक विकार दूर होतात.


समरणशक्ती वाढविण्यासाठी सर्वांगासन श्रेष्ठ आहे.


 दमा, सर्दी खोकला या विकारात सर्वांगासन फायदेशीर आहे


हत्ती पाय या आजारात सुद्धा सर्वांगासन रामबाण उपाय आहे


मधुमेग प्रदर रोग पोटाचे रोग यावर सुद्धा सर्वांगासन फायदेशीर आसन आहे


सर्वांगासन हॆ सर्व आसनामध्ये सर्वश्रेष्ठ आसन असून  याच्या नियमित सरवाने शरीर निरोगी बनून धष्ट पुष्ट बनते.



Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन