पाठदुखीसाठी योगासन | Back Pain Relief Yoga in Marathi
पाठदुखीसाठी योगासन | Back Pain Relief Yoga in Marathi
आजच्या धावपळीच्या जीवनात पाठदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे.
जास्त वेळ बसून काम करणे, चुकीची बैठक, शारीरिक हालचालींचा अभाव आणि ताणतणाव यामुळे अनेकांना पाठदुखीचा त्रास जाणवतो.
योगासनांचा नियमित सराव केल्यास पाठदुखी कमी होण्यास मदत होते आणि शरीर लवचिक राहते.
सूचना: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. तीव्र वेदना, दुखापत किंवा वैद्यकीय समस्या असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पाठदुखी होण्याची सामान्य कारणे
जास्त वेळ एकाच जागी बसणे
चुकीची झोपण्याची किंवा बसण्याची पद्धत
व्यायामाचा अभाव
वजन वाढणे
मानसिक ताणतणाव
पाठदुखीसाठी उपयुक्त योगासन
भुजंगासन (Cobra Pose)
भुजंग म्हणजे नाग या आसनाचे अंतिम स्थितीत शरीराचा आकार फणा काढलेल्या नागाप्रमाणे भासतो म्हणून या आसनास भुजंगासन असे म्हणतात.
भुजंगासन मणक्याची लवचिकता वाढवण्यास मदत करते.
यामुळे कंबरेवरील ताण कमी होतो आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.
भुजंगासन कसे करावे:
पोटावर झोपून, हातांच्या साहाय्याने छाती हळूहळू वर उचला.
श्वास सामान्य ठेवा आणि काही सेकंद स्थिती धरा.
मर्जरासन
(Cat–Cow Pose)
हे आसन केल्याने मणक्याच्या हालचाली सुधारतात आणि पाठीत साठलेला ताण कमी करते.
फायदे:
पाठ व मानदुखी कमी होण्यास मदत
शरीर हलके वाटते.
बालासन (Child Pose)
बालासन हे विश्रांती देणारे आसन आहे.
खालच्या पाठीला आराम मिळतो आणि मन शांत होते.
सेतुबंधासन (Bridge Pose)
या आसनामुळे कंबर आणि पाठीचे स्नायू बळकट होतात.
दीर्घकाळ बसून काम करणाऱ्यांसाठी हे आसन फायदेशीर ठरते.
पवनमुक्तासन
पवनमुक्तासन कंबरेतील जडपणा कमी करण्यास मदत करते.
पाठ आणि पोट दोन्हीसाठी हे आसन उपयुक्त आहे.
पाठदुखीसाठी प्राणायाम
अनुलोम–विलोम प्राणायाम
ताणतणाव कमी करण्यास मदत
भ्रामरी प्राणायाम
भ्रामारी प्राणायाम नियमित केल्यास मानसिक शांतता मिळते तसेच
पाठदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते
पाठदुखी असणाऱ्यांनी रोजच्या सवयी बदलणे आवश्यक आहे जसे की योग्य पद्धतीने सरळ बसणे
दर तासाला थोडी हालचाल करणे
झोपेसाठी योग्य उशी व गादी वापरणे
रोज किमान 15–20 मिनिटे योग सराव.
योगासन करताना घ्यायची काळजी
वेदना असताना जबरदस्तीने आसन करू नका
श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा
गर्भवती महिला किंवा गंभीर त्रास असलेल्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा
निष्कर्ष
योगासनांचा नियमित सराव केल्यास पाठदुखी कमी होण्यास मदत होते.
योगा केवळ शरीरासाठीच नव्हे तर मनासाठीही फायदेशीर आहे.
दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढून योगा केल्यास आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1 पाठदुखी साठी योगासन किंवा हलके व्यायाम उपयोगी आहे का?
हो योगासनांचा नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास पाठदुखी कमी होण्यास मदत होते. योगामुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात आणि मणक्याची लवचिकता वाढते.
प्रश्न 2 पाठदुखी साठी योगासन कधी करावे आणि किती वेळ करावे?
सकाळी रिकाम्या पोटी योगासन करणे अधिक फायदेशीर मानले जाते. सकाळ शक्य नसेल तर संध्याकाळी हलक्या जेवणानंतर 3–4 तासांनी योगासन करू शकता.सुरुवातीला ऐक आसन ऐक वेळा करावे आणि सवय झाल्या नंतर 1आसन 2ते, 3 वेळा करू शकता.
प्रश्न 3 किती वेळ योगा करावा?
दररोज किमान 15 ते 20 मिनिटे योगासन केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. सुरुवातीला कमी वेळ घ्या आणि हळूहळू वेळ वाढवा.
प्रश्न 4 पादुखी असताना कोणती योगासने करू नये?
तीव्र वेदना, स्लिप डिस्क किंवा दुखापत असल्यास कठीण आसन टाळावीत. वेदना वाढत असल्यास योगा करणे थांबवून तज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रश्न 5 योगासन केल्याने पाठदुखी कायमची बरी होते का?
योगासन पाठदुखी कमी करण्यास आणि त्रास टाळण्यास मदत करतो. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असल्याने परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात.
प्रश्न 6 महिला पाठदुखी साठी योगा घरी करू शकतात का?
होय, महिलांनीही योग्य मार्गदर्शनाखाली योगासनांचा सराव करू शकतात. गर्भधारणेदरम्यान किंवा इतर विशेष परिस्थितीत तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रश्न 7 योगासोबत आणखी काय करावे म्हणजे आहार विहार कसा असावा?
योगासोबत योग्य बैठक, नियमित हालचाल, संतुलित आहार आणि पुरेशी झोप याकडे लक्ष दिल्यास पाठदुखी कमी होण्यास मदत होते.
प्रश्न 8 योगासन करताना वेदना वाढल्यास काय करावे?
योगासन करताना वेदना वाढल्यास लगेच आसन थांबवावे आणि विश्रांती घ्यावी. त्रास कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
धन्यवाद
Yoga and Naturo Beauty clinic 9822363909
Comments
Post a Comment